पिंपरी-चिंचवड

चिखलीतील ८०० केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिखली-घरकुलमधील (ईडब्ल्यूएस) ८५ टक्के रहिवाशांच्या केशरी शिधापत्रिका बंद असल्याने त्यांना अन्नधान्य पुरवठा विभागाच्या फ परिमंडलाकडून चार रास्त भाव धान्य दुकानदार पाठवून धान्य वाटप करण्यात आले. 

चिखली घरकुलमध्ये सुमारे १४० सोसायट्या असून, त्यात भोसरी, वाकड, सांगवी, दिघी, देहूरोड, आकुर्डी, काळेवाडी, थेरगाव आदी भागांमधून आलेले सुमारे ५ हजार ५०० रहिवासी राहतात.  त्यांच्यापैकी, जवळपास दोन हजार रहिवाशांच्या केशरी शिधापत्रिकांवर घराचा जुना पत्ता असल्याने या रहिवाशांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच या परिसरात कोरोना रूग्ण आढळल्याने सर्व भाव सील करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांची उपासमार होण्याची भिती तेथील सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे व्यक्त केली होती. त्याची दखल घेत विभागाच्या फ परिमंडलाने धान्य वाटप केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

मगर म्हणाले, "घरकुलमधील सुमारे दोन हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मोरे वस्ती, चिखली गाव भागांतील चार रास्त भाव धान्य दुकानदारांनाच बोलावून घरकुलच्या मोकळ्या आवारात धान्य वाटप करण्यासाठी नेमण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे धान्य वाटप चालू असून, गुरूवारपर्यंत (ता.३०)  धान्य वाटप पूर्ण होण्याची अपेक्षा आहे."

अन्न धान्य वितरण विभागाचे फ परिमंडळ अधिकारी नागनाथ भोसले म्हणाले, "घरकुलमधील केशरी शिधापत्रिकाधारक जवळपास ५० दुकानदारांशी संबंधित आहेत. धान्यअभावी तेथील रहिवाशांची उपासमार होत असल्याचे आम्हाला समजले. त्यामुळे तेथे ४ रास्त भाव धान्य दुकानदारांमार्फत सुरक्षित सामाईक अंतर ठेवून धान्य वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत ८०० शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप झाले असून उर्वरित रहिवाशांना गुरूवार पर्यंत धान्य वाटप होईल."

या कामात घरकुल मधील युवराज निलवर्ण, आबासाहेब गवळी, शांताराम खुडे आदींचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT