Poshan aahar  Sakal
पिंपरी-चिंचवड

शाळा बंद असतानाही स्वयंपाकघर उपकरण संच वाटपाचा 'घाट'

भांड्यांची खरेदी कशासाठी आणि कोणासाठी? नेमके या आहारात ‘पोषण’ कुणाचे? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनामुळे शाळा बंद असतानाही शालेय पोषण आहार योजनेअंर्तगत शाळांना स्वयंपाकघर उपकरण संच वाटपाचा घाट प्राथमिक शिक्षण संचालक आणि महापालिका शिक्षण विभाग यांनी घातला आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळांना हवाबंद अन्न पुरविण्यात येते. मग या भांड्यांची खरेदी कशासाठी आणि कोणासाठी? नेमके या आहारात ‘पोषण’ कुणाचे? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. अनेक मुख्याध्यापकांनी यास विरोध केला आहे.

राज्यात २००९ पासून सर्व जिल्हा परिषद, महापालिका तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आहार दिला जातो. दोन वर्षापासून या योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील शाळांसाठी एकाच ठिकाणी खिचडी शिजविण्यासाठी ‘केंद्रीय स्वयंपाकघर कार्यप्रणाली’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शाळांना शिजवलेले अन्न हवाबंद डब्यातून पुरविण्यात येते. त्यासाठी पात्र संस्थांना भांडी खरेदीसाठी भांडवली खर्चदेखील दिलेला आहे. आता मात्र शिक्षण विभागाकडून ही योजना कुठेतरी अस्थिर वाटेवर असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोठ्या प्रमाणात स्वयंपाकघरातील भांड्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. परिणामी ही योजना मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीला त्रासदायी ठरू लागली आहे. उपकरण संच ताब्यात घेण्याची सक्ती मुख्याध्यापकांवर होत आहे. प्राथमिक शिक्षण संचालक आणि महापालिका शिक्षण विभागाकडून तशा आशयाचे आदेश शाळांना मिळाले आहेत. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने संच शाळेच्या पटसंख्येनुसार उपलब्‍ध करून देण्यात आले आहे. या उपकरणांचा वापर याच योजनेसाठी करावा, याची दक्षता घ्यावी, असे फर्मानही प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातून प्रत्येक शाळेला धाडण्यात आले आहे. सरकारच्या या बेजबाबदार धोरणाला प्राथमिक शिक्षक संघटनांनी मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे.

मुख्याध्यापकांच्या डोक्याला ताप

सध्या शाळा बंद आहेत. कधीपासून सुरू होतील, याविषयी काहीच सांगता येता नाही. अशा परिस्थितीत पोषण आहारासाठी स्वयंपाकगृह उपकरण संच साहित्य खरेदी करण्यात आली आहे. ती भांडी शाळांमध्ये पुरविली आहेत. विद्यार्थी संख्येनुसार स्टीलची टाकी, खिचडी पात्र, स्टीलचा डब्बा, स्टीलची भातवडी, चमचा, भोजन पात्र आदी भांड्यांचा भार मुख्याध्यापकांच्या डोक्यावर टाकला आहे. अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असल्याने टाकीची गरज नसल्याचे काही मुख्याध्यापकांनी सांगितले.

अडगळीत ताट-वाट्या

दहा वर्षापूर्वी अनेक शाळांमध्ये सरकारने मुलांना जेवणासाठी स्टीलचे ताट, वाटी व ग्लास पुरवली आहेत. परंतु, ती धुणार कोण? म्हणून त्‍याचाही फारसा वापर केला जात नाही. शाळेच्या अडगळीच्या खोलीत ताट, वाट्या पोत्यात बांधून ठेवले आहे. भांडी निकृष्ट दर्जाची आहेत, धुतली की गंज चढतो, असे शाळांचे म्हणणे आहे. असे असतानाही प्रचंड प्रमाणात भांडी खरेदी केली आहेत. आता ती वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. ही उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्‍न मुख्याध्यापकांना पडला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : विहीरीत पडलेल्या हरणास शेतकऱ्यांनी दिले जीवदान

दिग्पाल लांजेकरांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला; महाराजांची आग्रा स्वारी दिसणार, चित्रपटाचं नाव काय?

Maharashtra Politics: काँग्रेसचा मोठा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर? पालिका निवडणुकीआधी राजकीय भूकंपाचे संकेत

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

SCROLL FOR NEXT