पिंपरी-चिंचवड

...तर 'त्या' स्फोटातून ते बचावले असते

संजय बेंडे

भोसरी : दिघीतील महादेवनगरमधील अष्टविनायक सोसायटीमध्ये रविवारी (ता. 9) गॅस सिलिंडरच्या गळतीने स्फोट झाला. त्यामध्ये अंगावर भिंत पडून ज्ञानेश्‍वर मधुकर टेमकर (वय 40) यांचा मृत्यू झाला. घटनेच्या एक दिवस आधी शनिवारी (ता. 8) टेमकर कुटुंबीय त्यांच्या मूळगावी मंचरमधील अवसरी येथे जाणार होते. मात्र, काही कारणामुळे ते जाऊ शकले नाही. त्यांनी गावाला रविवारी सकाळी सात वाजता जाण्याचे ठरवले होते. परंतु, त्यापूर्वीच सकाळी साडेसहाला गॅसचा स्फोट झाला. त्यात ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे गावाला जाणे राहूनच गेले. 

महेंद्र हरिभाऊ सुरवाडे यांच्या घरात रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गॅसचा स्फोट झाला. त्यात सुरवाडे यांच्यासह टेमकर यांच्या फ्लॅटची भिंत पडली. यामध्ये ज्ञानेश्‍वर यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी कामाला सुटी असल्याने टेमकर कुटुंबीय शनिवारी त्यांच्या मूळगावी मंचरमधील अवसरी येथे मुक्कामी जाण्यास निघाले होते. मात्र, काही कारणाने त्यांना जाता आले नाही. त्यामुळे टेमकर यांनी रविवारी गावाला जाण्याचा निर्णय घेतला. डुडुळगाव येथे राहणाऱ्या टेमकर यांची बहीण श्‍यामल पाचपुते या रक्षाबंधनाला मुलगी श्रावणी पाचपुतेसह (वय 14) त्यांच्याकडे आल्या होत्या. रक्षाबंधनानंतर श्रावणी ही टेमकर यांच्याकडेच राहिली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी टेमकर कुटुंबीय गावाला जाणार होते. त्यामुळे श्रावणीला घेण्यासाठी श्‍यामल पाचपुते, पती विजय पाचपुते यांच्यासह शनिवारी टेमकर यांच्या घरी आले. मात्र, मंचरला जाताना त्यांना डुडुळगावाला सोडतो, असे सांगत टेमकर कुटुंबीयांनी पाचपुते कुटुंबीयांना घरी राहण्याचा आग्रह केला. त्यामुळे पाचपुते कुटुंबीयही टेमकर यांच्याकडे राहिले. रविवारी सकाळी साडेपाच वाजताच टेमकर कुटुंबीय उठले होते. ज्ञानेश्‍वर हे अंघोळीला निघण्यापूर्वीच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात भिंत कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्रावणी पाचपुते हिच्या पायालाही गंभीर दुखापत होऊन ती जखमी झाली. घरातील इतर कुटुंबीय किचन आणि बेडरूममध्ये असल्याने बचावले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्फोट गॅस गळतीनेच... 

स्फोटाविषयी नागरिकांत उलटसुलट चर्चा होती. दिघी पोलिसांद्वारे पाचारण केलेल्या बॉंबशोधक पथकाने रविवारी (ता. 9) रात्री घटना स्थळाची पाहणी केली. मात्र, हा स्फोट बॉंबसदृश्‍य वस्तूंचा नसून, गॅस गळतीनेच झाल्याचा दुजोरा पथकाने दिला, अशी माहिती दिघी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रविराज कांबळे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT