पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने ‘निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ या मेळाव्याचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजन केले होते.
पिंपरी - महापालिका प्रभाग रचना आदिंचे प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुका केव्हाही लागू शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, गाफील राहू नये. निवडणुकांचा कल बदलला आहे. तो लक्षात घेतला पाहिजे. तज्ञांचा संसाधन संघ (रिसोर्स टिम) स्थापन करुन औद्योगिक पट्टा, सध्याचा विकसीत भाग याचा विचार करुन जाहिरनाम्यात सुधारणा करा, अशा सूचना विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शनिवारी (ता. ६) चिंचवड येथे केल्या.
पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने ‘निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ या मेळाव्याचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, मंगला कदम, अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकर, शमिम पठाण, प्रशांत शितोळे, भाऊसाहेब भोईर, जगदिश शेट्टी, नाना काटे, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, समिर मासुळकर, राहुल भोसले, संजय वाबळे आदि उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, जिल्हा परिषदा, महापालिका व नगरपालिका यांच्या मुदत संपल्या. परंतु; आता पुन्हा प्रभाग रचना बदलून लोकप्रतिनिधींची संख्या कमी केली जात आहे. तुम्हाला पदे हवीत बाकीच्या कार्यकर्त्यांना पद घेवू वाटत नाही का? तो त्यांचा अधिकार आहे. संविधानावर भारत एक संघ राहिलाय. पण; या लोकांनी लोकशाहीचा मुडदा पाडला, खुन केला आहे. लोकांमधून नगराध्यक्ष मग; महापौर, मुख्यमंत्री, पंतप्रधान सगळीकडेच हे धोरण राबवा ना. हे कसे चालेल. फुले-शाहू-आंबेडकरांच्या राज्यात हे चालणार नाही. जनतेच्या मनात आल्यावर जनता भल्याभल्यांचे सरकार उलथून टाकते.
सत्ता बदल करुनही जे वाटले ते घडले नाही
मागील पाच वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेत कसे काम झाले, हे सर्वांना माहित आहे. कुठल्याही शहराचा विकास होताना कोणीतरी सल्ला, मारस्गदर्शन करण्यासाठी चुकल्यास अंकुश ठेवणारा असावे लागते. एक आदरयुक्त दबदबा हवा. शहरातील नागरिकांनी माझे काम बघीतले आहे. मागील पाच वर्षात त्यांनी दुसऱ्या लोकांना सत्ता दिली. पण; जे वाटले तसे घडले नाही. याचाही विचार पिंपरी-चिंचवडकरांनी करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
महागाईत गरीबांना कशाला कर लावता - पवार
पेट्रोल महागले म्हणून लोकांनी डिझेलच्या गाड्या घेतल्या. डिझेलही पेट्रोलच्या जवळ गेल्यावर लोकांनी सीएनजीच्या गाड्या घेतल्या आता सीएनजीचा दरही केंद्रातील भाजपच्या सरकारने पेट्रोल एवढाच केला आहे. का बनवाबनवी करता, का फसवणूक करता. जीएसटीमुळे महागाई वाढविली जातेय. सरकार चालविताना कर लावावा लागतो मान्य आहे. परंतु; गरीबांना कशाला लावता. हे कळले पाहिजे. तेही अलीकडे कळेना झालेय, सगळेच भरडतात, अशी महागाईवरुन अजित पवार यांनी टिका केली.
राज्याचे अधिकार चिफ सेक्रेटरी यांना देवून तुम्हीही घरीच बसा - पवार
राज्याचे धिकार सचिवांना दिले आहेत. राज्याचे अधिकार चिफ सेक्रेटरी यांना देवून तुम्हीही घरीच बसाना. बाकीच्यांनी काय करायचे तुमच्याकडे बघत बसायचे की दिल्लीच्या वाऱ्या मोजत बसायचे. बंडखोर सर्व आमदारांना मंत्री पद देता येणार नाही म्हणून तुम्ही लांबवताय का? जे आहे ते सांगा. जनतेला जाणून घेण्याचा अधिकार आहे.
आमदार बनसोडे, विलास लांडे यांच्या अनुपस्थिततीची चर्चा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आण्णा बनसोडे व माजी आमदार विलास लांडे यांची मेळाव्यास अनुपस्थिती होती. गेल्या कही दिवसात ते नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, आमदार बनसोडे आजारी आहेत. ते सकाळीच माझ्याकडे येणार होते. परंतु; आजारी असल्यामुळे आले नाहीत. विलास लांडे यांचाही पुण्यातील दावाखान्यात गेले आहेत. त्यांचा मुलगा विक्रांत माझ्याबरोबर बोलला. बर ते गेले तरी दुसऱ्या दोघांना संधी मिळेल ना? माझ्या पक्षाची काळजी करु नका. पत्रकारांनीही राज्याच्या, देशाच्या हिताच्या गोष्टी विचाराव्यात.
कार्यक्रमात विनायक रणसुभे यांनी प्रास्तविक केले. कार्यकर्त्यांच्यावतीने भाऊसाहेब भोईर, पल्लवी पांढरे, कविता खराडे, प्रसन्न डांगे, विजय लोखंडे, शिवाजी पाडुळे, वर्षा जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. दिपक साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. संजय अवसरमल यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.