पिंपरी-चिंचवड

डॉक्टरांकडूनही फिटनेसला प्राधान्य; ताणतणाव घालवण्यासाठी कसा व्यायाम करतात जाणून घ्या

सुवर्णा नवले

पिंपरी : कोरोना काळात सर्वांनाच आहारा-विहाराची समज आणि उमज आली आहे. दिवसभरातील व्यस्त दिनचर्येतून डॉक्‍टरही याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. आहार आणि व्यायामाची सांगड घालून वैद्यकीय क्षेत्रानेही तंदुरुस्ती जपली आहे. ऋतुमानाप्रमाणे वातावरणात होणारे बदल, दैनंदिन कामकाजाचा ताणतणाव यातूनही डॉक्‍टरी पेशा असलेले शहरातील वैद्यकीय दूत योगा, जॉगिंग आणि हिवाळ्यातील समतोल आहाराला अधिक प्राधान्य देतात. 

सकाळी वायसीएममधील शासकीय व खासगी सेवेतील डॉक्‍टर यांचा योगा, जॉगिंगसह वॉकिंगवर अधिक भर आहे. स्ट्रेचिंग, ऍरोबिक्‍ससह बहुतांश जण नियमित जिमला जातात. दिवसभर उभे राहून काम करणे, शरीरातील पाणी पातळी टिकविणे, संयमाने काम करणे व रुग्णांशी आपुलकीने बोलणे हे मल्टिटास्किंग काम डॉक्‍टरांना करावे लागते. मानसिक आरोग्य चांगले टिकविण्यासाठी ध्यानधारणेबरोबरच योग्य आहार व झोप याकडे ते काटेकोरपणे लक्ष देत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शरीरात प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्‌स व स्निग्ध पदार्थाचे प्रमाण योग्य पातळीत हवे. ऋतुमानानुसार बदल शरीरात व पर्यायी आहारात करणे अत्यावश्‍यक आहे. अतिरिक्त हायप्रोटिन्स व स्निग्ध पदार्थ नकोत. आहारातून फळभाज्या व कच्चे पदार्थ शरीराला मिळायला हवेत. वीस टक्के प्रथिने यामध्ये अंडी, दूध व मोड आलेली कडधान्ये अपेक्षित आहेत. त्याचप्रमाणे बाजरी, ज्वारीच्या भाकरी आवश्‍यक आहे. तेल-तूपही योग्य प्रमाणात आहारात ठेवावे. 
- राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय 

आमचा मॉर्निंग जॉगर्स ग्रुप आहे. यामध्ये वयाच्या साठीपर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. बरेच जण प्राधिकरणातील जिमलासुद्धा नियमित जातात. रावेत ब्रिजच्या बाजूला आम्ही नित्यनियमाने व्यायाम करतो. 10 किलोमीटर रनिंग करतो. 
- डॉ. सुहास माटे, इंडियन मेडिकल असोसिएशन, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


 आपण द्विपाद आहोत. आपल्या खाण्यावर नियंत्रण हवे. दोन वेळा जेवणे व वेळेवर झोपणे हा मूलमंत्र आहे. रनिंग किंवा वॉकिंग हवेच. मानसिक संतुलन टिकविण्यासाठी व आत्मिक समाधानासाठी ध्यान व आध्यात्मिक वाचन करावे व ऐकावे. 
- डॉ. हेमराज नारखेडे, स्त्रीरोगतज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय 

डॉक्‍टरांचा सल्ला 

  • दररोज 40 ते 50 मिनिटे चाला 
  • आहार समतोल ठेवा 
  • आवडेल तो व्यायाम करा 
  • दिवसातून अनेकदा खाणे टाळावे 
  • चौकस आहार करावा 
  • इतर पेयांपेक्षा अँटिऑक्‍सिडंट्‌ससाठी ग्रीन टी घ्या 
  • थंडीत उष्णवर्धक पदार्थांचे सेवन करा 
  • स्निग्ध व प्रथिनयुक्त पौष्टिक पदार्थच घ्या 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेच्या हिताविरोधात काम! ६६ जागतिक संघटनामधून बाहेर पडण्याची ट्रम्प यांची घोषणा; भारताच्या नेतृत्वाखालील संस्थेचाही समावेश

Latest Maharashtra News Updates : तडीपार गुन्हेगार माजी आमदार अनिल भोसले प्रचारात

'मी कोणासारखी बनण्यासाठी इथं आले नाही' तापसी पन्नूने सांगितला तिच्या करिअरचा सुरुवातीचा काळ, म्हणाली...'मला वाईट गोष्टी...'

PM Kisan Scheme Update : पीएम किसानचे दोन हजार बंद होणार, पती-पत्नी दोघांनाही लाभ; बनावट शेतकऱ्यांची नावांची आली यादी

Vaibhav Suryavanshi : वैभवच्या नेतृत्वाखाली मालिका विजय मिळवला अन् आता भारताचा कर्णधार बदलला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT