पिंपरी-चिंचवड

Video : पिंपळे गुरवमधील 'या' उद्यानाचे सौंदर्य बघण्याची संधी होती, मात्र...

मिलिंद संधान

नवी सांगवी ( पुणे ) : पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे सृष्टी सौंदर्य चांगलेच फुलले आहे. मागील दीड महिन्यांपासून देशात लॉकडाउन असल्यामुळे प्रदूषण पातळी पूर्णपणे खाली आली आहे. परिणामी सर्वच ठिकाणचे नैसर्गिक सृष्टी सौंदर्य खुलले असल्याने पिंपळे गुरव येथील हे उद्यान त्याला अपवाद कसे ठरेल.

नऊ एकरातील हे उद्यानाचे दुबईच्या धर्तीवर मिरॅकल गार्डनमध्ये नुतनीकरण करण्यात येत आहे. मागील तीन वर्षांपासून हे नुतनीकरण सुरू असून, ते कोणत्या ना कोणत्या कामामुळे मागे पडत होते. या बाबत 'सकाळ'ने वेळोवेळी पाठपुरावाही केला. त्याचा परिणाम म्हणून यंदाच्या मे महिन्यात हे उद्याने पूर्णत्वाला येऊन सामान्यांसाठी खुलेही होणार होते. त्याप्रमाणे त्याचे कामही वेगात सुरू होते. बागकाम, फुलझाडे, जॉगिंग ट्रॅक, डायनोसॉरचे रंगकाम, सिव्हिल वर्क यासारखे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केवळ विद्युत विभागाचे क्षुल्लक काम राहिले होते. परंतु, अचानक हे कोरोनाचे संकट आल्यामुळे काम रखडले. असे असले तरी येथील झाडेझुडपांना नियमित पाणी व त्यांची देखभाल सुरू आहे. त्यातच लॉकडाउनमुळे बागेत सामान्य नागरिकांना मनाई असल्याने हे उद्यान चांगलेच फुलले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील फ्लॉवर बेड, हिरवळ, फुलझाडे, जॉगिंग ट्रकवरील दीर्घायुषी झाडे चांगलेच टवटवीत झाले आहेत. त्यामुळे हे उद्यानाचा लुक एखाद्या हिलस्टेशन सारखा झाला आहे. ऐन उन्हाळ्यातील चाळीस डीग्री तपमानातसुध्दा येथील झाडेझुडपांवर सुर्याची लंबरूप किरणे चमचम करीत आहेत. बालचमुंचे खास आकर्षण असणारा डायनोसॉरची प्रतिकृतीमुळे हे उद्यान ज्युरासिक पार्कसारखेच दिसत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi Babri Masjid : बाबरी मशीद पाडल्यावर सोनिया गांधींना कोसळलेले रडू; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत

IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, KBCमध्येही अपयश; अखेर शॉर्टकट म्हणून गुन्हेगारीचा मार्ग निवडला, बीटेक पदवीधर तरुणाला अटक

Indian Air Force : तेरा हजार फुटांवरील धावपट्टीवर ‘आयएल-७६’ हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; चीनबरोबरील ‘एलएसी’जवळ लँडिंग

Mohammed Shami शिवाय भारतीय वेगवान गोलंदाजी अपूर्ण, तो न्यूझीलंड दौऱ्यात हवा होता, रवी शास्त्री स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update: अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईतील निवासस्थानाबाहेर चाहत्यांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT