Electric vehicles
Electric vehicles sakal
पिंपरी-चिंचवड

Pune : ई-बाइकपाठोपाठ ई-मोटारलाही पसंती!

सुवर्णा गवारे

पिंपरी : पेट्रोल व सीएनजीचे दर कमी होत नसल्याने वाहनचालकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिल्याचे दिसत आहे. मागील वर्षात १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत इलेक्ट्रिक १७ हजार ७१३ ‘ई’ वाहनांची खरेदी झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांना दिवसेंदिवस प्रवास खर्च परवडेनासा झाला आहे. महागाईचा भडका उडाल्याने व त्यातच पेट्रोले दर वाढल्याने आता प्राधान्याने इलेक्ट्रिक वाहन खरेदी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना सरासरी एका किलोमीटरला एक ते दीड रुपया खर्च येत आहे. तर, सीएनजी व पेट्रोलमुळे इंधन खर्च परवडेनासा झाला आहे.

तसेच, पर्यावरण जपण्याकडेही नागरिकांचा कल वाढल्याने इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळू लागली आहे. दैनंदिन प्रवासासाठी वाहन निकडीचे बनल्याने तसेच, आर्थिक गणित कोलमडल्याने इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीला अधिक पसंती मिळू लागली आहे. बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्या देखील कर्मचाऱ्यांना ‘इ’ वाहने वापरण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसून येत आहे.

शहरात ७० ते ८० किलोमीटरचा नोकरीसाठी प्रवास करणाऱ्यांमकडेही इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी नजरेस पडत आहे. तसेच, रिक्षाचालकांनाही सीएनजी परवडत नसल्याने ‘इ’ रिक्षा खरेदीकडे कल वाढला आहे. सीएनजी ४० रुपये असताना प्रवासी वाहतूक परवडत होती.

तसेच, ओला व उबेर सारख्या प्रवासी वाहनांसाठी देखील आता ‘इ’ वाहनांची मागणी वाढली आहे. परिणामी, एकूणच इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळू लागली असून वाहन खरेदी वाढल्याचे पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयाकडे झालेल्या वाहन नोंदणीवरुन दिसून आले आहे.

  • वाहन प्रकार ‘इ’ वाहन संख्या

  • मोटार सायकल १६,३२१

  • ‘ई’ रिक्षा २०

  • ‘ई’ रिक्षा कार्ट ७५

  • मोपेड १

  • गुडस कॅरिअर ७

  • मोटार कार ४९

  • मोटार कॅब ४९

या कारणांमुळे वाढला कल

  • इंधनावरील खर्चात प्रचंड कपात

  • दुरुस्तीचा खर्च प्रचंड कमी

  • इलेक्ट्रिक वाहनांना मिळकत करातून सवलत

  • सोसायटीत व शोरूमध्येही चार्जिंगची सुविधा

  • कंपन्यामध्येही चार्जिंगची सुविधा

  • विजेच्या वेगळ्या मीटरची सोय

इंधन खर्चाची बचत होत आहे. दररोजचे केवळ तीन युनिट वीज लागते. शंभर किलोमीटर दुचाकी जाते. दररोज चार तास बॅटरी चार्जिंग करतो. पेट्रोल व डिझेलने शंभर रुपयांचा टप्पा पार केल्यामुळे माझा खर्च आवाक्याच्या बाहेर गेला होता.

नोकरीवरही पेट्रोलची दुचाकी नेणे परवडत नव्हते. ज्या ठिकाणी माझे इंधनासाठी किलोमीटरला ८ ते १० रुपये खर्च होत होते. त्या ठिकाणी २ ते ३ रुपये खर्च होत आहे. वीजबिलाचा खर्चही परवडत आहे. कंपनीने देखभाल-दुरुस्ती १ वर्षासाठी दिली आहे. तर, वाहनाची वॉरंटी पाच वर्षाची आहे. शिवाय, ‘ई’ दुचाकीची बॅटरी मी कुठेही चार्जिंग करू शकतो.

- नितेश शिंदे, इलेक्ट्रिक वाहनधारक, निगडी.

स्वच्छ इंधन आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नागरिकांचा कल बदलला आहे. पेट्रोल व डिझेल वाहने इलेक्ट्रिक वाहनांपेक्षाही महाग असून नागरिक खरेदी करीत आहेत.

- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT