पिंपरी-चिंचवड

सुरक्षा कवच नसतानाही 'ते' करताहेत कोरोना ड्युटी!

आशा साळवी

पिंपरी :  ना त्यांना विम्याचे सुरक्षा कवच, ना त्यांना नियमित शिक्षकांच्या सरकार व महापालिकेच्या सेवाशर्ती व नियम लागू. मिळते फक्त तुटपुंजे मानधन. तरीही ते करताहेत 'कोरोना ड्यूटी'. हे आहेत महापालिका शाळांमधील शिक्षण सेवक. महापालिका प्रशासनाकडून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकाअंतर्गत सुमारे 80 कार्यरत शिक्षण सेवक व  शिक्षण सेविकांना 'कोरोना ड्युटी'चे आदेश बजावण्यात आलेले आहेत. परंतु, हे शिक्षण सेवक आणि  सेविका हे नियमित शिक्षक नाहीत. त्यांना नियमित शिक्षकांना असलेल्या सरकार व महापालिकेच्या सेवाशर्ती व नियम अद्याप लागू नाहीत. केवळ सहा हजार रुपये मानधनावर  त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अनेक महिला शिक्षण सेविकांचे लहान बाळ आहे. तर  काही स्तनदा माता, काही गर्भवती आहेत, अशाही त्यांच्या अडचणी आहेत. तरीही अशा स्थितीत घरोघरी जाऊन कोरोना सर्व्हेक्षण करीत आहेत. अशा स्थितीत कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्तीची बळावते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विशेष म्हणजे संबंधित शिक्षण सेवक आणि शिक्षण सेविका  व त्यांच्या कुटुंबाला कोणतेही सुरक्षा कवच (1 कोटीचा विमा )  नसल्याने महापालिका व सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे दुर्दैवाने कोरोनाची ड्युटी करीत असतांना एखाद्या शिक्षण सेवकास कोरोनाची लागण होऊन  कोरोना संसर्गामुळे दरम्यान मृत्यू  झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? बृहन्मुंबई महापालिकेनेही शिक्षण सेवकांचे या  कामाचे आदेश रद्द केले आहेत.  मग आपल्याकडे का नाही असा प्रश्न सेवकांकडून विचारण्यात येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"या वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून नेमणूक दिलेल्या सर्व शिक्षण सेविकांचे कोरोना सर्व्हेक्षणाचे आदेश तात्काळ रद्द करावेत."

- मनोज मराठे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT