पिंपरी-चिंचवड

कासारवाडीत पाच तासांपासून विजेचा खोळंबा!

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : कासारवाडी येथे शंकरवाडी नाल्याचे काम सुरू असल्यामुळे मंगळवारी (ता. १६) दुपारी साडेतीन वाजता केबल तुटली आहे. त्यामुळे मागील पाच तासांपासून कासारवाडीत विजेचा खोळंबा झाला आहे. वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने कासारवाडीकर हैराण झाले आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत रस्त्याचे व इतर कोणतीही कामे सुरु करताना महावितरणला पूर्वसूचना देणे अपेक्षित आहे.  याबाबत महावितरणला पूर्णपणे अंधारात ठेऊन काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे महावितरणने सांगितले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांनी महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. महापालिकेचे अधिकरी रस्त्यांच्या कोणत्याही कामाची पूर्वसूचना देत नसल्याने नाहक महावितरणला समस्यांचा भडिमार सहन करावा लागत आहे. त्यात मनुष्यबळ अपुरे पडत आहे. अशा नियोजन शून्य कारभारामुळे महावितरणाच्या कामात वारंवार व्यत्यय येत आहे. शिवाय नागरिकांना ही वर्क फ्रॉम होमला अडथळा निर्माण होत आहे. रात्री 9 पर्यंत वीज पुरवठा सुरळित होणार असल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यामुळे झाला विजेचा खोळंबा

शंकरवाडी नाल्याचे पावसाळी पूर्वीच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. त्या नाल्याची जेसीबीने गाळ काढण्याचे काम सुरू असताना केबल तुटली आहे. त्यामुळे शास्त्रीनगर, केशवनगर, रेल्वे गेट परिसर भागात बत्ती गुल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Life-Saving Injection 9 Crore Case: अनिकाच्या उपचारांसाठी ९ कोटींच्या इंजेक्शनची गरज, हायकोर्टाने गुजरात सरकारवर ओढले ताशेरे; 'चिमुकली लाडकी बहीण नाही का?'

Why Lionel Messi Cried? लिओनेल मेस्सी त्यादिवशी का रडला? कुटुंबियांनी सांगितली अर्जेंटियन स्टारच्या मनातली भीती, वडिलांना...

Monsoon Update : मॉन्सून रखडला! राज्यात आता 'या' तारखेनंतरच वाढणार पावसाचा जोर,हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

Maharashtra TET Exam 2026 : राज्यात सव्वा दोन लाख शिक्षक देणार 'टीईटी'; २८ जूनला होणार परीक्षा, सहा लाख अर्जांची नोंदणी, अशी असेल केंद्रांची रचना

TET Exam 2026: राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय! ‘टीईटी’साठी दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी; गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

SCROLL FOR NEXT