Electronics manufacturing cluster sakal
पिंपरी-चिंचवड

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर मंजूरीचा पुणे जिल्ह्यातील उद्योजकांना फायदा होणार

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींग क्लस्टरची गुंतवणूक आल्यामुळे रांजणगांव, शिक्रापूर, चाकण, तळेगांव, पिंपरी-चिंचवड या परिसरातील उद्योजकांना याचा फायदा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींग क्लस्टरची गुंतवणूक आल्यामुळे रांजणगांव, शिक्रापूर, चाकण, तळेगांव, पिंपरी-चिंचवड या परिसरातील उद्योजकांना याचा फायदा होणार आहे.

पिंपरी - राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणा अंतर्गत रांजणगांव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर मंजूरीचा व सुमारे २००० कोटी रुपये गुंतवणूकीचा पुणे जिल्ह्यातील फक्त इलेक्ट्रॉनिक्सच नव्हे तर; औद्योगिक क्षेत्रातील सर्व उद्योजकांना फायदा होणार आहे. त्यामुळे रांजणगांव परिसरासह जिल्ह्याचा चौफेर विकास होणार असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी सोमवारी (ता. ३१) व्यक्त केली.

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींग क्लस्टरची गुंतवणूक आल्यामुळे रांजणगांव, शिक्रापूर, चाकण, तळेगांव, पिंपरी-चिंचवड या परिसरातील उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. आयएफबीसारखी रेफ्रीजीरेशनची कंपनी सुमारे ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याने इलेक्ट्रॉनिक्ससह प्रेसपार्ट, फॅब्रीकेशन, रबर, प्लॅस्टिक्स अशा औद्योगिक क्षेत्रातील सर्वच उद्योजकांना त्याचा फायदा होणार आहे. या लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योजकांचा सुटा भाग त्या ठिकाणी पुरवठा केला जाणार आहे. त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान येणार असेल तर; त्याचाही फायदा उद्योजकांना होईल.

- संदिप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटना.

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींग क्लस्टरची सुमारे २००० कोटींची गुंतवणूक येणार असल्याने इलेक्ट्रॉनिक्ससह अन्य उद्योजकांनाही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन नवीन उद्योग सुरु करण्याची संधी मिळू शकते. या सर्व गुंतवणूकीचा लघु-मध्यम-सूक्ष्म अशा सर्वच उद्योजकांना फायदा होईल. ॲटोमाबाईल क्षेत्रात आता मोठ्या कंपन्या ई-वाहनांकडे गुंतवणूकीसाठी वळल्या आहेत. त्यामुळे या क्लस्टरचा नक्कीच या ई-वाहन उद्योग क्षेत्राला फायदा होईल. वाहन उद्योग वाढला की आपोआप सुट्या भागांचा पुरवठा करणारे छोटे-मोठे उद्योगही वाढीस लागणार.

- अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT