Oxygen
Oxygen Sakal
पिंपरी-चिंचवड

उद्योजकांकडे ऑक्सिजनचा साठा पडून

सुवर्णा गवारे-नवले

पिंपरी - कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) घटल्याने मेडीकल ऑक्सिजनची (Oxygen) मागणी तीस टक्क्यांवर आली आहे. उद्योजकांना (Entrepreneurs) अद्याप वीस टक्के ऑक्सिजन पुरवठा दिला जात असून, कोरोनामध्ये वाढलेले दर पन्नास टक्क्यांनी कमी झाले आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मेडिकल ऑक्सिजनची गरज ओळखून ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे राहिले. उर्वरित सत्तर टक्के ऑक्सिजन शिल्लक राहत असून, बड्या कंपन्या साठ्याच्या प्रश्नामुळे हैराण झाल्या आहेत. परिणामी, मोठ्या कंपन्यांकडे साठा पडून राहिल्याचे समोर आले आहे. (Entrepreneurs have Stocks of Oxygen)

सध्या ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या अमेरिकन, इंग्लंड, जपान या बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी तीन कंपन्या चाकण, तळेगाव शहरात आहेत. पाचशे कोटींची उलाढाल असणाऱ्या या कंपन्या आहेत. रिफिलिंग करण्यापासून निर्मिती करणाऱ्या लहान-मोठ्या सतरा कंपन्या व तीन एअर सेपरेशन युनिट शहरात आहेत. स्टील व वाहनांचे सुट्टे भाग जोडणाऱ्या कंपन्यांना लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होणे आवश्यक असतो. मात्र, त्यांना तो कमी पडला. कोरोना काळात ऑक्सिजनची ३६० मेट्रिक टन मागणी सध्या १५० मेट्रीक टनावर आली आहे. केंद्र सरकारने ८५ टक्के उद्योगांना ऑक्सिजन पुरवण्याची मुभा दिली आहे. परंतु, राज्य सरकारने हे नियम शिथिल न केल्याने सरकारच्या या कारभारावर उद्योजक नाराज आहेत.

औषध प्रशासनाची आज बैठक

तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्यासाठी ऑक्सिजन कंपन्यासोबत उद्योजकांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून, मेडीकल ऑक्सिजनविषयी चर्चा केली जाणार असल्याचे औषध प्रशासन सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी सांगितले.

कोरोनात कंपन्या मालामाल

इतरवेळी उद्योजकांना मिळणारा सिलिंडर नऊ ते दहा हजार रुपयांत मिळत होता. कोरोना काळात ही किंमत सोळा ते सतरा हजार रुपये झाली. १७ क्युबिकच्या एक सिलिंडरची किंमत वीस रुपये आहे. साधारण तो १४० रुपयांपर्यंत डिलरने विकला तर अत्यावश्यक गरजेपोटी तो १७० ते १८० रुपयाला खरेदी केला. लघु कंपन्यांनाही मेडीकल ऑक्सिजनचा परवाना दिला गेल्याने त्या देखील अवघ्या तीन महिन्यांत मालामाल झाल्या.

प्लाझ्मा कटिंग मशिनची वाढली मागणी

कोरोना काळात प्लाझ्मा कटिंग मशिनची मागणी वाढली. स्टील कंपन्यांना या मशिनची सर्वाधिक गरज असते. ३५ ते ४० हजार रुपयांना मिळणारी ही मशिन ६० ते ७० हजार रुपयाला लघु उद्योजकांनी खरेदी केली. एरवी मागणी नसणाऱ्या मशीनला अचानक मागणी वाढली.

बऱ्याच कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने वीस टक्के ऑक्सिजन पुरवठा पुरेसा होत आहे. आठ क्युबिक मीटर म्हणजेच दहा टन इतका पुरवठा कंपन्यांना पुरेसा आहे. बऱ्याच बड्या कंपन्या प्लांट सुरू ठेवण्यासाठी ऑक्सिजन हवेत सोडून देत आहेत. मागणीअभावी कंपन्यांकडे पन्नास टक्क्यांच्यावर ऑक्सिजन वापराविना पडून आहे.

- संदेश सेठिया, सेठिया गॅस कंपनी, मालक, भोसरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT