पिंपरी-चिंचवड

Video : यांनी लॉकडाउनमध्ये अशी संधी शोधली, ज्याचा सगळ्यांनाच होतोय फायदा...

अवधूत कुलकर्णी

पिंपरी : लॉकडाउनमुळे अनेकजण अडचणींचा सामना करत आहेत. मात्र, या संकटात संधी शोधणारे असतातच. पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने नेमके हेच केले असून, घरपोच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या सेवेला संघटितपणाचे रुप दिले आहे. त्यामुळे आठ दिवसात सहभागी सोसायट्यांची संख्या 200 वरुन 500 पर्यंत गेली आहे.

गेल्या महिन्यात सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला, फळे विक्री सुरू झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर सोसायटीच्या आवारात फिरत्या एटीएम मशिनद्वारे पाच हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची सुविधा दिली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला. त्यामुळे टप्प्याटप्प्याने फेडरेशनने अधिक संघटितपणे आणि व्यापक स्वरूपात आणखी सेवा सुरू देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये भाजीपाला, फळे, किराणा, दुग्धजन्य पदार्थ, सॅनिटायझर, डिझेल, बेकरी प्रॉडक्‍टस आणि एका बड्या कंपनीच्या बिस्किटांसह विविध उत्पादनांचा समावेश आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अशी आहे पद्धत 

फेडरेशनच्या सभासद असलेल्या सोसायटीला ऑनलाइन एक अर्ज पाठविला जातो. या अर्जामध्ये सोसायटीचे नाव, पत्ता, संपर्क साधण्यासाठी संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, अशी माहिती भरून फेडरेशनला पाठवावी लागते. हे सर्व ऑनलाइन पद्धतीने होते. त्याचप्रमाणे या आठ सुविधा हव्या असल्याचा सोसायटीच्या दोन तृतियांश सभासदांनी मंजूर केलेला ठराव फेडरेशनला द्यावा लागतो. त्यानंतर फेडरेशनने मंजूर केलेल्या विविध विक्रेत्यांची माहिती संबंधित सोसायटीला दिली जाते. सोसायटी त्यांच्या गरजेप्रमाणे संबंधित विक्रेत्यांना त्यांच्या त्यांच्या सोसायटीत स्टॉल उभारण्यास सांगते. त्यामुळे सोसायटीमधील सभासदांना या सर्व सेवा सुरळीतपणे आणि रास्त दरात मिळतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राजकारण्यांच्या हस्तक्षेपात घट 

फेडरेशनच्या सभासदांना विविध वस्तूंचा पुरवठा करण्यासंदर्भात पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा प्रभाव सोसायट्यांना जाणवत असे. मात्र, आता त्यापासून बऱ्याच अंशी सोसायट्या मुक्त झाल्या आहेत. त्याचाही त्यांना फायदा होत आहे. 

आमच्या उपक्रमाला फेडरेशनच्या सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आम्हाला अधिकृत विक्रेते शोधणे त्यांच्याकडून आवश्‍यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा होण्याची समस्या जाणवत आहे. त्याचप्रमाणे भविष्यात सभासदांना एखाद्या नामांकित स्वयंसेवी संस्थेकडून मास्क घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

- तेजस्विनी ढोमसे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Humanity Helps: नाझियाच्या मदतीला धावली माणुसकी! ती सहा महिन्यांपासून देतेय आजाराशी झुंज; उपचारासाठी लाखोंचा खर्च..

Ambajogai Crime : कला केंद्रात कामाचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

SCROLL FOR NEXT