Police  sakal
पिंपरी-चिंचवड

पोलिस भरतीसाठी होणार आज परीक्षा

पोलिस आयुक्तालयांतर्गत ७२० जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस शिपाई पदासाठी शुक्रवारी (ता. १९) लेखी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा सहा जिल्ह्यातील ४४४ केंद्रावर होणार असून, यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. पोलिसांकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त, व्हिडिओ शूटिंग व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भरारी पथके कार्यरत राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ७२० जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून त्या अंतर्गत शुक्रवारी (ता. १९) दुपारी तीन ते साडे चार या वेळेत लेखी परीक्षा घेतली जात आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद येथील ४४४ केंद्रांवरील सात हजार ३८४ परीक्षा हॉलमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एक अतिरिक्त पोलिस आयुक्त, १५ उपायुक्त, २५ सहायक आयुक्त, १७७ निरीक्षक, ६३६ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक १२ हजार ८३८ कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. केंद्रावर व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल. केंद्रावर कडक तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना काय काळजी घ्यावी याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाचे...

  1. जागा : ७२०

  2. उमेदवार : १,८९,७३२

  3. परीक्षेचा दिनांक : १९ नोव्हेंबर

  4. वेळ : दुपारी तीन ते साडे चार

  5. ठिकाण : पुणे, नागपूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक

  6. जिल्ह्यात एकूण केंद्र : ४४४

  7. बंदोबस्त : १२,६९६ अधिकारी, कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार?

Karjat Accident: कर्जत रस्त्यावर अपघात, सात विद्यार्थी जखमी; अकलुज येथील वॉटरपार्कला जात हाेते अन् अचानक काय घडलं!

"शाळानंतर 18 सिनेमे केले पण रिलीज झाले नाहीत" अंशुमनने व्यक्त केली खंत; म्हणाला..

कोस्टल कॉरिडॉरमुळे नकाशा बदलणार! अटल सेतू आता अलिबागकडे वळणार; नवा मार्ग कसा असणार?

Pune Crime: नारायणगाव येथे बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या तरुणास अटक, तलवारी जप्त व खंजीर जप्त..

SCROLL FOR NEXT