Mumbai-Pune Expressway block Esakal
पिंपरी-चिंचवड

Expressway Block : द्रुतगती मार्गावर उद्या (मंगळवार) दोन तासांचा विशेष ब्लॉक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्ते विकास महामंडळाच्या वतीने आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी ओव्हर हेड ग्यांट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्ते विकास महामंडळाच्या वतीने आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी ओव्हर हेड ग्यांट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावर उद्या (मंगळवार) दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहतूक १२ ते २ दरम्यान बंद राहणार आहे.

द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या अलीकडे किलोमीटर ४५ आणि ४५.८०० किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार असल्याने हा ब्लॉक घेतला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

यावेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाणार आहे. तसेच हलकी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळविण्यात येणार आहे. मात्र मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Latest Maharashtra News Updates : दादरमध्ये उज्ज्वल निकम यांचा सत्कार समारंभ

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Kapil Patil: राष्ट्रवादीच्या खासदाराचा अजब दावा, खिल्ली उडवत माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT