पिंपरी-चिंचवड

Video :...या व्यावसायिकांनाही लॉकडाउनची झळ

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : 'गरिबांचा फ्रिज' अशी त्याची ख्याती. पण त्यालाही कोणी आता विचारेनासे झाले आहे. भर उन्हातून आल्यावर त्याच्यातील पाणी पिल्यावर शरीराला जाणवणारा गारवाही मिळेनासा झाला आहे. माठ व्यवसायाची ही स्थिती मन विषण्ण करणारी असल्याचे रविवारी (ता. 10) बाजारपेठेतून फिरल्यावर जाणवले. 

सामान्यांना फ्रिज विकत घेणे, त्यासाठी वीजबिलापोटी पैसे मोजणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकजण पिण्याच्या पाण्यासाठी काळा अथवा लाल माठ खरेदी करतात. त्याला दरवर्षी मोठी मागणीही असते. फ्रिजचे पाणी अनेकांना बाधते. त्यामुळे डॉक्‍टर उन्हाळ्यात फ्रिजचे पाणी न पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे गरीबांप्रमाणेच काही उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत नागरिकही आवर्जून माठ खरेदी करतात. 


काय आहे स्थिती 

लॉकडाउनमुळे माठाचे प्रमुख ग्राहक असलेल्या गरिबांच्या हाताला काम नाही. त्यामुळे उत्पन्नच बंद झाले आहे. अनेकांना त्यांच्या केलेल्या कामाचे मालकांनी एकतर दिलेच नाहीत किंवा त्यांना 20 ते 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे गरिबांच्या क्रयशक्तीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जेथे पर्यायच नसेल अशाच खर्चाला (उदा. धान्य, औषध) या वर्गाकडून प्राधान्य देण्यात येताना दिसून येते. काही गरीब, तर सरकारी अथवा खासगी अन्नछत्रांवरच जेवणासाठी अवलंबून आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

माठांच्या किमती 

माठांच्या किमती यंदा गतवर्षीच्या तुलनेत काहीही वाढ झाली नाही. त्यांच्या किमती 100 ते 300 रुपयांपर्यंत आहेत. पाणी पिणे सोयीचे व्हावे, यासाठी या माठाला प्लॅस्टिकचे नळही बसविण्यात आले आहेत. आधीच मालाला उठाव नाही. त्यातच दुकानाची वेळही सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंतच आहे. त्याचाही विक्रीला फटका बसला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यवसायाची स्थिती 

गुजरात, राजस्थान, पश्‍चिम बंगाल येथून शहरात माठ विक्रीस येतात. 
साधारणपणे 70 ते 80 रुपये किंमत असलेला एक माठ विक्रेत्याच्या दुकानापर्यंत वाहतूक खर्च आणि अन्य खर्चामुळे तो त्याला 100 रुपयांना पडतो. त्यामुळे एका माठामागे त्याला केवळ दहा ते 20 रुपये मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 


दृष्टिक्षेपात व्यवसाय 

  • बिहार, उत्तरप्रदेश, पश्‍चिम बंगालमधील विक्रेत्यांचे आधिक्य 
  •  शहरात 200 हून अधिक व्यावसायिक
  • लॉकडाउनबरोबरच मागणी कमी आणि वाढत्या स्पर्धेचा खपावर परिणाम  

माठांना मागणी येईल, म्हणून कर्ज काढून गुंतवणूक केली. मात्र मागणी नाही. यंदाचा सीझन संपत चालला आहे. विक्रीअभावी फायदा तर सोडाच पण तोट्यातच माठ विकावे लागत आहेत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने मदत करावी. 

- कामुतकुमार सिंग, माठ विक्रेता, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इराणला शस्त्र देणाऱ्या देशांना ५०% टॅरिफ लागणार; युरेनियम संवर्धन करणार नाही, सीजफायरनंतर ट्रम्प यांचा मोठा निर्णय!

अवैध मासेमारी करणाऱ्यांनो सावधान! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आता ड्रोनची नजर राहणार; सरकारचा नवा प्लॅन लागू

Sahyadri Express Railway Route : सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे मार्गात मोठा बदल, कोल्हापूर-पुणे खडकीपर्यंतच धावणार रेल्वे; मुंबईच्या प्रवाशांचे होणार हाल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा पराभव झाला, तरी ड्रेसिंग रुममध्ये तिघांना पुरस्कार मिळाला; हार्दिक पांड्याचा चेहरा पाहण्यासारखा होता Video

TV Safety Tips : एक चूक अन् घरातला टीव्ही होईल ब्लास्ट; त्यामुळं उन्हाळ्यात अजिबात करू नका 'या' 2 गोष्टी

SCROLL FOR NEXT