पिंपरी-चिंचवड

शेतकऱ्यांना पिंपरी भाजी मंडई बंद? काय अडचणी येताहेत...जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील प्रमुख सर्व भाजी मंडईं त्यांच्या मूळजागी परत सुरू झाल्या असल्या, तरी ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना पिंपरी कॅम्प येथील श्री लाल बहादूरशास्त्री भाजी मंडईत शेतमाल विकण्यासाठी लाल दिवा दाखविण्यात आला आहे. काही शेतकरी माल घेऊन आलेच, तर त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत होणारी तोलाई, पावती मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

शहर परिसरामध्ये पूर्वीपासून पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडई हे 'टोपली मार्केट' म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी शेतकरी कोणत्याही मध्यस्थ किंवा दलालाशिवाय स्वतःचा शेतीमाल विकू शकतो. तेथे शेतकरी कट्टा असून शेतकऱ्यांना स्वतः वजन काटा लावून माल विकता येतो. मागील काही दिवसांपासून शहरातील पिंपरी कॅम्पसहीत चिंचवडगाव, भोसरी, आकुर्डी या प्रमुख भाजी मंडई सुरु झाल्या आहेत. मात्र, पिंपरी कॅम्प येथील मंडईत शेतीमाल आणण्यास शेतकऱ्यांना अजून नीट परवानगी मिळालेली नाही. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डुडुळगाव येथील शेतकरी चंद्रकांत वहिले म्हणाले, "पिंपरी उपबाजारात शेतमाल विक्री करण्यास अद्याप आम्हाला परवानगी नाही. गेल्या 30 वर्षांपासून शेतमाल विक्रीसाठी आणत आहोत. आमचा तिथे जम बसला आहे. मोशी उपबाजारात दलाल कमिशन घेतात. शेतमाल विक्रीस आणला तरी आम्हाला पोलिसांकडून मारहाण होण्याची भीती राहते. त्यामुळे काही शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येत नाहीत. पिंपरी कॅम्प येथे पूर्वीप्रमाणे शेतमाल विकण्याची परवानगी मिळावी, यासाठी आमचे शिष्टमंडळ लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मागणी करणार आहे.'' 

वाकड येथील शेतकरी संपत विनोदे म्हणाले, "माझी चांदखेडला शेतजमीन आहे. गेल्या 30 ते 32 वर्षांपासून मी पिंपरी कॅम्प येथे शेतमाल विक्रीसाठी आणत आहे. हा बाजार टोपली मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे बाजार समितीचे तोलणार वजनकाटा करुन पावती करतात. मात्र, सध्या बाजार समितीचे तोलणार नसतात. त्यामुळे पावत्या होत नाहीत. त्यामुळे एखादा शेतकरी माल घेऊन आलाच तर व्यापाऱ्यांकडून ठरलेल्या बाजारभावापेक्षा कमी पैसे मिळतात. त्यामुळे आम्हाला बाजार समितीच्या नियंत्रणाखाली पूर्वीप्रमाणे शेतमाल विकण्याची परवानगी मिळावी.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"आमच्याकडून शेतकऱ्यांना पिंपरी कॅम्प येथे शेतमाल आणण्यास कोणतीही मनाई करण्यात आलेली नाही. पूर्वीप्रमाणे, त्यांच्या मालाच्या पावत्याही केल्या जातील. परंतु, पिंपरी कॅम्प परिसरातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे त्याबाबतचे अंतिम अधिकार महापालिकेला राहतील.'' 
- बी.जे.देशमुख, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे 

काय आहे वस्तुस्थिती आणि अडचणी ! 

  • मावळ, मुळशी, हवेली आणि खेड तालुक्‍यातील सुमारे दीडशे शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी येतो. 
  • वाकड, पुनावळे, रावेत, माण, घोटवडे, चिखली, निघोजे आदी 20 ते 25 गावांतील शेतकऱ्यांचा समावेश 
  • दररोज सुमारे दोन ते अडीच टन मालाची आवक 
  • पिंपरी मंडई चालू; मात्र, सध्या शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र मार्ग नाहीत 
  • पालिकेने तेथील अतिक्रमणे हटविली. परंतु, पत्रे कायम. 
  • शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच पहाटे शेतमाल आणण्याची परवानगी हवी 
  • शेतमालाच्या विक्रीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 ही वेळ गैरसोयीची. त्यामुळे, गर्दीत वाढ होण्याची शक्‍यता 
  • सकाळी दुकाने उघडल्यावर वाहने उभी करण्यासही जागा मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT