Attack esakal
पिंपरी-चिंचवड

सुनेवर प्राणघातक हल्ला करून सासऱ्याची आत्महत्या

सुनेच्या डोक्यात हत्याराने मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर सासऱ्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना थेरगाव येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

सुनेच्या डोक्यात हत्याराने मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर सासऱ्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना थेरगाव येथे घडली.

पिंपरी - सुनेच्या डोक्यात हत्याराने मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर सासऱ्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना थेरगाव येथे घडली.

सूर्यकांत मारुती वणवे (वय ७४, रा. बेलठीकानगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या सासऱ्याचे नाव आहे. प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सुशील सूर्यकांत वणवे यांनी फिर्याद दिली आहे. सूर्यकांत हे फिर्यादी सुशील यांचे वडील आहेत. फिर्यादी सुशील हे त्यांचे वडील, पत्नी, आई यांच्यासह एकत्र राहतात. शुक्रवारी (ता. २०) दुपारी अडीचच्या सुमारास सूर्यकांत व त्यांची सून घरी होते.

त्यावेळी सूर्यकांत यांनी कोणत्यातरी हत्याराने सुनेच्या डोक्यात मारहाण केली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर सूर्यकांत यांनी त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या सुनेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT