पिंपरी-चिंचवड

बापरे! पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यवसायाला एवढ्या कोटींचा फटका बसलाय...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायाला लॉकडाउनच्या काळात जवळपास 55 कोटी रुपयांचा फटका बसला असून, सुमारे 55 हजार कामगारांपैकी 95 टक्के कामगार त्यांच्या मूळगावी परतले आहेत. त्यामुळे या व्यवसायाला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने वीज, पाणी, मिळकतकर माफीबरोबरच विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

देशात लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी हॉटेल बंद न करता सर्व शासकीय अटी-शर्तींचे पालन करून चालू ठेवण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यावसायिकांनी घेतला होता. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी हॉटेलमधील टेबलांचे अंतर वाढविणे, वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करणे, साफसफाई करणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आदी उपाययोजना करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍन्ड रेस्टॉरंट असोसिएशनने घेतला होता. मात्र, देशात लॉकडाउन लागू झाल्यावर हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी म्हणाले, "हॉटेल व्यवसायामधून सरकारला सर्वाधिक जीएसटीचा भरणा होत आहे. मागील वर्षी सरकारने उत्पादन शुल्कात (एक्‍साईज)मध्ये 15 टक्के वाढ केली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली असून हॉटेल व्यवसाय संकटात आहे. लॉकडाउनच्या काळात हॉटेल व्यवसायाचे सुमारे 50 ते 55 कोटी रुपये इतके नुकसान झाले आहे. सुमारे 55 हजार कामगारांपैकी 50 हजार कामगार त्यांच्या गावी परतले आहेत. त्यामुळे या काळातील उत्पादन शुल्क, वीज, पाणी आणि मिळकतकर माफ करावेत, अशी आमची मागणी आहे. याशिवाय, आम्हाला विशेष आर्थिक पॅकेजही दिले जावे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संघटनेचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांनी या बाबत पालकमंत्री अजित पवार यांना नुकतेच निवेदन दिले. बॅंकाचे थकीत हफ्ते, कामगारांचा तुटवडा, भरमसाठ भाडे, इतर देणी यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे लघुउद्योगांच्या धर्तीवर राज्य सरकारने हॉटेल व्यवसायाला आर्थिक पॅकेज देऊन त्याचे पुनर्वसन करावे, असे त्या निवेदनात म्हटले आहे. 


पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यवसाय 

  • स्टार हॉटेल्स - 8 
  • बार/ परमीट रुम - 200 
  • 'अ', 'ब' आणि 'क' श्रेणी मिळून एकूण संख्या - सुमारे 1200 
  • हॉटेल असोसिएशनची सदस्यसंख्या - 450

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Rule Changes: लोनशी संबंधित हे 4 नियम आजपासून बदलले! CIBIL स्कोरमध्ये मोठा बदल; आता या गोष्टींसाठी चार्ज नाही

Minor Girl Incident : नाशिक जिल्हा अश्लीलतेच्या चर्तेतून बाहेर जात नाही, खरातनंतर खासगी व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलीबाबत उचललं चुकीचं पाऊल

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : सांगली ZP विषय समिती निवडी बिनविरोध; महाविकास आघाडीची सरशी

SCROLL FOR NEXT