Crime 
पिंपरी-चिंचवड

आकुर्डीत दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधीखुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रोशन छबुराव काळे (वय ३४, रा. प्राधिकरण, निगडी) यांच्या फिर्यादीनुसार, बालाजी सातपुते, योगेश मानकेरे, श्रेयस टाकळकर, रोहित ओवाळ, आदित्य यादव, शुभम दत्तात्रय जाधव व त्यांच्या दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपी बालाजी व योगेश हे गंगाई उद्यानात मद्यपान करत असल्याने फिर्यादी यांनी त्यांना टोकले होते. तसेच २० मार्चला झालेल्या भांडणात फिर्यादी यांनी मध्यस्थी केली होती. या कारणावरून आरोपींनी कोयते व सिमेंटच्या ब्लॉकने मारून फिर्यादी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.

तर शुभम दत्तात्रय जाधव (वय २१, रा. गंगानगर, आकुर्डी) यांनीही फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण काळे, रोशन काळे, साहिल काळे, सागर कान्हूरकर, राहुल कान्हूरकर, प्रदीप गुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव मंगळवारी (ता. २३) रात्री शतपावली करण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांचे मित्र त्यांच्यासोबत होते. काही वेळेपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी जाधव यांना शिवीगाळ करून सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. काठीने, पट्ट्याने मारून प्राणघातक हल्ला केलाचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT