पिंपरी-चिंचवड

नगरसेवक, पत्रकार असल्याचं सांगत पोलिसांशी घातली हुज्जत, मग...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : 'मी पत्रकार आहे', 'मी नगरसेवक आहे', 'गाववाला आहे', 'तुमची नोकरीच घालवतो', अशा भाषेत पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यासह वीस जणांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

अमर अशोक कापसे (वय 42, रा. नवमहाराष्ट्र विद्यालयासमोर, पिंपरी) याच्यासह अन्य वीस जणांवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिस शिपाई रावसाहेब खोडदे यांनी फिर्याद दिली. रविवारी (ता. 12) रात्री अकराच्या सुमारास पिंपरीतील पत्राशेड येथील अय्यप्पा मंदिरासमोर बेकायदेशीररित्या सुमारे वीस जण एकत्र येऊन जेवण व मद्यपान करीत होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावेळी तेथे आलेल्या पोलिसांनी जमावाला जाब विचारला असता आरोपी कापसे याच्यासह जमावाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच 'मी पत्रकार आहे', 'मी नगरसेवक आहे', 'येथील गाववाला आहे', अशी अरेरावीची भाषा वापरून गोंधळ घातला. या बाबत पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Gokul Election Heat in Kolhapur : 'गोकुळ'ची धामधूम असतानाही आलात त्याबद्दल तुमचे आभार; मंत्री मुश्रीफांकडून सतेज पाटील यांचा चिमटा

SCROLL FOR NEXT