पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये वादळ अंगावर झेलत तीन दिवस लढले अग्निशमन दलाचे लढवय्ये!

सुवर्णा नवले

पिंपरी :  गेल्यावर्षी पुराचं भयानक संकट अनुभवलं. पण यावर्षी वादळ, सोसाट्याचा वारा, उन्मळून पडलेली मोठमोठी झाडं आणि पावसाचा तडाखा आम्ही अनुभवतोय. एकीकडं विजांच्या तारा अंगावर झेलतोय, तर दुसरीकडे फांद्या तोडून हात बधिर झाले. मात्र, न डगमगता काम करतोय. हेच आमचं कर्तव्य आहे. 

हे अनुभव सांगतायेत पिंपरीतील अग्निशमन दलाचे जवान. सलग दहा ते बारा तास दिवसभर झाड पडल्याचे कॉल सुरू होते. एक वर्दी झाली, की दुसरी वर्दी लगेच लागत होती. त्यातही दिवसभर पाण्यात. काही परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवत जवानांना चहा दिला. दिवसपाळीनंतर लगेचच रात्रपाळीत सलग १६ तास  जवानांना काम करावे लागले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या पिंपरी-चिंचवडच्या पाच उपअग्निशमन केंद्रात मिळून १२५ जवान आहेत. ही संख्या शहरासाठी नगण्य आहे. त्यामुळे वर्दीची संख्या जास्त आणि मनुष्यबळ कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तरीही सलग तिसऱ्या दिवशी (ता. ५) जवानांचे काम सुरू आहे. अजूनही रस्त्यावरील रहदारी सुरळीत केली जात आहे. आजही मोडकळीस आलेल्या झाडांचे 20 ते 25 कॉल होते. त्यामुळे सलग तीन दिवस जवान अहोरात्र काम करत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काही ठिकाणी नागरिकांनी असहकार्य दाखविल्याने जवानांना मनस्ताप सहन करावा लागला. झाडे काढताना नागरिकांनी जवानांना अरेरावी केली. दुसरी वर्दी असल्याने बहुतांश नागरिकांनी पडलेले झाड लगेच हटविण्यात यावे असा हट्ट धरला. दुसऱ्या वर्दीवर जाण्यासाठी त्यामुळे जवानांना विलंब झाला. बाचाबाची करण्याची वेळ जवानांवर आली. तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून फांद्या हटविण्यासाठी मदत केली. जीवितहानी कुठे झाली नसल्याचे समाधान जवानांनी व्यक्त केले.

जवानांना ही होती धाकधूक

  • फांद्या अंगावर पडण्याची भीती
  • विजेचा खांब कोसळण्याची भीती इलेक्ट्रिक स्वा मशीन (जाड फांद्या कापण्याचे मशीन )बंद पडल्याने फांद्या कापण्याची कसरत
  • स्थानिक नागरिकांचे हद्दीवरून असहकार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT