पिंपरी-चिंचवड

मावळ : वणव्याच्या आगीत होरपळली पठारे

सकाळवृत्तसेवा

टाकवे बुद्रुक (ता. मावळ) : मावळात गेल्या दोन आठवड्यांत वणवा लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात पवन मावळातील बऊर डोंगर, नाणे मावळातील नाणे-नाणोली डोंगर व माळरान, आंदर मावळातील कुसूर पठारावर लागलेल्या वणव्यामुळे पठारावरील संपूर्ण रान जळाले असून, वनसंपदेची मोठी हानी झाली आहे. पठारावरील सर्व चारा जाळून खाक झाल्याने तिथे राहणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मावळ भागातील अनेक शेतकऱ्यांकडील जनावरे माळरानावरील व डोंगरातील गवतावर अवलंबून आहे. माळरानावरील, डोंगरातील व पठारावरील गवत हे  जनावरांचा वर्षभराचा चारा असतो. मात्र, कुसूर पठारावर लागलेल्या वणव्यात पठारावरील चारा जाळून खाक झाल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. वणव्यामुळे अनेक जंगली वनस्पतींची हानी झाली असून, लाखो पक्षी बेघर झाले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वणवे लागू नये म्हणून मोठमोठ्या मोहिमा उभारल्या पाहिजे. प्रशासनाने गांभिर्याने दखल घेऊन असे वणवे लावणाऱ्यांना कडक शिक्षा केली पाहिजे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझ्याकडे ३२ गाई, वासरे असून, सर्व जनावरे पठारावरील चाऱ्यावर अवलंबून आहेत. वणवा लागल्याने चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळ उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, मग जनावरांना खाण्यासाठी चारा कोठून आणणार? दानशूर व्यक्तींनी गाईंच्या चाऱ्यासाठी मदत करावी.
- कोंडिबा आखाडे, शेतकरी, कुसूर

वावरात ठेवलेला गवत पेंढा वणव्यात जळून खाक झाला. मावळातील वणवे मुक्‍या जनावरांच्या पोटावर उठले की काय?
- अनंता आंद्रे, नाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT