पिंपरी-चिंचवड

मावळातील पाच जण झाले कोरोनामुक्त, त्यामुळे आता...

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात आढळलेल्या १६ कोरोना रुग्णांपैकी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील बहुतांशी व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले असून, आता कोणताही तपासणी अहवाल पेंडिंग नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे मावळ तालुका सुरुवातीचा दीड महिना कोरोनामुक्त राहिला होता. त्यांनतर तळेगाव स्टेशन येथे पहिला व माळवाडी येथे दुसरा रुग्ण आढळला होता. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर तालुक्यात बाहेरून विशेषतः मुंबईवरून येणाऱ्यांची संख्या वाढत गेली व त्याबरोबर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली. शहरी भागात सहा, तर ग्रामीण भागात दहा रुग्ण आढळून आले.  अहिरवडे, नागाथली, वेहेरगाव, चांदखेड, घोणशेत, कामशेत, परंदवडी, तळेगाव दाभाडे,  खंडाळा या गावांमध्ये सलग रुग्ण आढळले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चांदखेड येथील रुग्णाच्या संपर्कातील चार व खंडाळा येथील रुग्णाच्या संपर्कातील एका व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तळेगाव स्टेशन व माळवाडी पाठोपाठ आता अहिरवडे, घोणशेत व चांदखेड येथील रुग्णाचे दुसरे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पाच झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संपकातील बहुतांशी व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. सध्या कोणताही तपासणी अहवाल पेंडिंग नसल्याची माहिती डॉ. लोहारे यांनी दिली. दोन दिवस दिलासादायक वातावरण असले, तरी धोका कायम असल्याने नागरिकांनी गाफील न राहता प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी सुरूच ठेवावी असे आवाहनही डॉ. लोहारे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT