पिंपरी-चिंचवड

लॉकडाऊनचे नियम पाळा; अन्यथा...

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वडगाव पोलिसांनी लॉकडाऊन नियमांची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. शनिवारी दिवसभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 39 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यापासून ही संख्या वाढली आहे. आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगाव मावळ पोलीसांनी  लॉकडाऊन नियमांची पुन्हा कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. कार्यक्षेत्रात पोलिस गस्त सुरु करून जनजागृती केली जात आहे. तसेच लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धडक मोहीम चालू केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंदर मावळ परिसरात पर्यटन बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी फळणे फाटा येथे नाकाबंदी लावून पर्यटकांना रोखण्यात येत आहे. नियम मोडून पर्यटनासाठी येणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत. शनिवारी ३९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात पर्यटनबंदीचे उल्लंघन  करणाऱ्या १५ जणांवर, मास्क न घालता फिरणाऱ्या १९ जणांवर व लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या पाच जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक निंबाळकर यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढील काळातही अशीच कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम कटाक्षाने पाळावेत व कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन निंबाळकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

SCROLL FOR NEXT