पिंपरी-चिंचवड

Video : दारूसाठी काय पण म्हणतात, ते यासाठी...

संजय बेंडे

भोसरी : दारूची दुकाने सुरू होणार, या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर भोसरीतील इंद्रायणीगरातील एका दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांनी गर्दी केली होती. एरवी रेशन, किराणा दुकान, भाजी मंडई येथे खरेदी करण्यासाठी नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करतात. मात्र, दारूच्या दुकानाबाहेर सोशल डिस्टंन्सिंग पाळत नागरिकांनी सुमारे एक किलोमीटर लांबपर्यंत रांग लावली होती. या बाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांना गर्दी केल्याची माहिती कळताच पोलिसांनी सर्वांना हुसकावून लावले.

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी देशासह राज्यात संचारबंदी लागू झाली. त्यामुळे सर्वच दुकाने बंद ठेवावी लागली. दारूची दुकानेही बंद ठेवण्यात आल्याने तळीरामांची पंचाईत झाली. दारूची दुकाने उघडली जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तळीरामांनी भोसरीतील इंद्रायणीनगरातील एका दारूच्या दुकानाबाहेर प्रचंड गर्दी केली. सकाळपासूनच दुकानाबाहेर अगदी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत तळीराम थांबले होते. मात्र, तळीरामांद्वारे सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

दारू खरेदी करण्यासाठी मोठमोठ्या पिशव्या घेऊन तळीराम बाहेर थांबले होते. विशेष म्हणजे रणरणत्या उन्हातही ते आपली रांग न मोडता तळपत थांबले होते. याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत तळीरामांना हुसकावून लावले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिसरातील दारूची दुकाने सुरू करण्याचा सरकारचा आदेश  अद्याप आमच्यापर्यंत आलेला नसल्याने दारूची दुकाने बंदच राहणार असल्याची माहिती भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT