gang attack Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : माजी नगरसेवकाच्या मुलाला तलवारीने मारहाण

एका माजी नगरसेवकाच्या मुलाला दुसऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलासह सहा जणांच्या टोळक्याने तलवारीने मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

एका माजी नगरसेवकाच्या मुलाला दुसऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलासह सहा जणांच्या टोळक्याने तलवारीने मारहाण केली.

पिंपरी - एका माजी नगरसेवकाच्या (Corporator) मुलाला (Son) दुसऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलासह सहा जणांच्या टोळक्याने तलवारीने (Sword) मारहाण (Beating) केली. यामध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार चिंचवडगावातील भोई आळीमध्ये घडला.

प्रशांत नागेश आगज्ञान (वय ४४, रा. भोई आळी, चिंचवड) व त्याचा मित्र अक्षय सूर्यवंशी अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी सूरज हरिभाऊ तिकोणे (वय २७, रा. दत्तनगर, थेरगाव) याला अटक केली असून त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. प्रशांत भाजपचे माजी नगरसेवक नागेश आगज्ञान यांचा मुलगा आहेत. तर सूरज माजी नगरसेवक हरिभाऊ तिकोणे यांचा मुलगा आहे. शनिवारी (ता. ७) थेरगाव येथे आरोपी व फिर्यादीमध्ये भांडण झाले होते. या भांडणाचा राग सूरजच्या मनात होता. दरम्यान, रविवारी (ता.८) रात्री साडे आठ वाजता प्रशांत हे भोई आळी येथे मित्रांसोबत गप्पा मारत असताना सूरज साथीदारांसह तेथे आला. शिवीगाळ करीत प्रशांत यांना तलवारीने मारहाण केली. तसेच अक्षय यांनाही मारहाण केली. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT