पिंपरी-चिंचवड

मावळात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, आज किती रुग्ण वाढले पाहा

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी तळेगाव येथील तीन व लोणावळा येथील एक, अशा चार जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११५ झाली आहे.

तळेगाव येथील एका ५२ वर्षीय व्यवसायिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणे जाणवल्याने तो सोमाटणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याच्या संपर्कातील पाच जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. 
तळेगाव येथील रहिवासी व चिंचवड येथील कंपनीत कामाला असलेल्या २७ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कंपनीत पॉझिटिव्ह आलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने यालाही संसर्ग झाला आहे. चिंचवड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याच्या संपर्कातील दोन व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. तळेगाव येथील दुसऱ्या एका ४८ वर्षीय कामगाराचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणे आढळल्याने तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १ तारखेला तो दाखल झाला होता. त्याच्या संपर्कातील पाच जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.  

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नांगरगाव (लोणावळा) येथील एका ६२ वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणे जाणवल्याने १ तारखेला त्यांना तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना इतरही आजार आहेत. त्यांच्या संपर्कातील तीन जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. दरम्यान, तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११५ झाली असून, त्यात शहरी ४७ तर ग्रामीण भागातील ६८ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून ४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ६६ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT