पिंपरी-चिंचवड

देहूरोडमध्ये कोरोनाबाधिताचा मृत्यू, तर कॅंटोन्मेंट बोर्डाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

देहू (पुणे) : देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यात शुक्रवारी (ता. 3) एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाने बोर्डाच्या हद्दीत येत्या 5 जुलै ते 8 जुलैपर्यत चार दिवसांचा लॅाकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ दूध, मेडिकल, सरकारी कार्यालय, बॅंक, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप सुरु राहणार आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन बोर्ड प्रशासनाने केले आहे. 

बोर्डाच्या हद्दीत सध्या 14 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. तर 10 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बोर्ड प्रशासन आणि सर्व सदस्यांनी चार दिवस देहूरोड बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. रविवारपासून (ता. 5) ते बुधवारपर्यंत (ता. 8) बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केवळ सकाळी 6 ते 10 यावेळेत दूधविक्री सुरु राहणार आहे. तर मेडिकल, बॅंक, पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत. भाजीमंडई पूर्णपणे बंद राहणार आहे, असे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. बोर्डाच्या वैद्यकीय अधिकारी डॅा. सुनिता जोशी यांनी सांगितले, बोर्डाच्या हद्दीत एकूण 25 रुग्ण आहेत. त्यापैकी 14 अॅक्टीव्ह आहेत. तर एकाचा मृत्यू झालेला आहे.10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT