पिंपरी-चिंचवड

Video : काल वाजविलेल्या ढोल-ताशाबद्दल माजी महापौर म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ''गुन्हे दाखल करायचे तर करा. मी कुणालाही बोलवलं नव्हतं. मी रॅली काढली नाही. कुणाला ढोल वाजवायला सांगितले नाही. जे काही केले ते नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे झालेलं आहे. चुक भूल देणे घेणे. स्वागत केले ते सूद्धा पाच मिनिटांत केलं. जमावबंदीचं उल्लंघन केलेले नाही. मी संभाजीनगरवासियांसाठी जीवाची पर्वा केलेली नाही. तर, गुन्ह्याची काय पर्वा करणार आहे,'' हे वाक्य आहेत, पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांचे. 

चिंचवड-संभाजीनगर परिसरातील एका महिलेसह त्यांच्या पतीला कोरोनाची बाधा झाली होती. ही महिला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयात त्या कार्यरत होत्या. रुग्णांची सेवा करीत होत्या. एक दिवस श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यासह त्यांच्या पतीच्या घशातील द्रवाचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे तपासण्यासाठी पाठवले होते. ते पॉझिटिव्ह आले आणि ते राहात असलेल्या संभाजीनगर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने परिसर सील केला. इकडे चौदा दिवस त्या दांपत्यावर रुग्णालयात उपचार झाले. त्यानंतर सलग चोवीस तासांच्या अंतराने घशातील द्रवाचे नमुने घेऊन तपासण्यात आले. दोघांचेही दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यांना आनंद झाला. त्यांच्या डिस्चार्जची तयारी रुग्णालय प्रशासनाने सुरू केली. मात्र, राजकीय पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत ही वार्ता संभाजीनगर परिसरात पोचली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी त्यांच्या स्वागताची तयारी सुरू केली. इकडे त्यांना घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयातून निघाली. याचा निरोपही परिसरात पोचला. ढोलताशे वाजू लागले. अवघ्या काही मिनिटांत रुग्णवाहिका त्यांच्या घरापासून काही अंतरावर थांबली. बरे होऊन घरी आल्याचे समाधान व  संकटातून वाचल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. कोरोना विषाणूवर त्यांनी मात केली ही जमेची बाजूच आहे. परंतु, अतिउत्साही राजकिरणी व नागरिकांनी ढोल-ताशांचा गजर केला. सर्व नितीनियम पायदळी तुळवण्यात आले. सोशल डिस्टसिंगचा नियम पायदळी तुळवण्यात आला. जमावबंदी व संचारबंदीचा आदेशाचीही पायमल्ली झाली. याबाबत सजग नागरिकांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली. काहींनी पोलिसांना कळविले आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. 
कारण, कायद्याचा भंग होता.

कायदा काय सांगतो? 

सोशल डिस्टन्सिंग : सोशल डिस्टंसिंग म्हणजे दोन व्यक्तींमधील सामासिक अंतर. दोन व्यक्तींमध्ये किमान तीन ते चार फुट अंतर ठेवायला हवे. दांपत्याचे स्वागत करणाऱ्या नागरिकांनी मात्र, याकडे सरसकट दुर्लक्ष केल्याचे आढळले. 

जमावबंदी : कोरोनाही राष्ट्रीय आपत्ती जाहीर झालेली आहे. या काळात पोलिस आयुक्तांचा जमावबंदी आदेश अर्थात भारतीय दंड संहिता कलम 144 लागू आहे. त्यानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत शेकडो नागरिक जमा झाले होते. 

संचारबंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी संचारबंदी आदेश अर्थात भारतीय दंड संहिता कलम 188 लागू केले आहे. यानुसार विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. 

तरीही शेकडोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर आले होते. आणि गुन्हा दाखल झाला. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणे, बेकायदेशीररित्या जमाव जमवणे, संचारबंदीचा आदेश न पाळणे आणि ढोल ताशा वाजवून सार्वजनिक शांतता भंग करणे, असे चित्र गुरुवारी संभाजीनगर परिसरात बघायला मिळाले.  याप्रकरणी विद्यमान नगरसेविका व माजी महापौर मंगला कदम, अमेय सुधीर नेरुरकर, कल्पेश गजानन हाने, संतोष शिवाजी वराडी (सर्व रा. संभाजीनगर, चिंचवड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी (ता. 30) दुपारी अडीचच्या सुमारास बेकायदेशीर जमाव जमवून संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांनी फोडले जनतेवर खापर
गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगला कदम यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात त्या म्हणतात, ''कालचा व्हिडिओ जो व्हायरल झाला आहे. कोवीड पेशंटचे स्वागत केले आहे. त्याबाबतचे मेसेज येतील. त्याने कोणीही घाबरून जाऊ नका. आपली भगिनी कोवीड वॉर्डमध्ये सर्विस करून दोन महिन्यांनी घरी आली. पहिल्या बॅचमध्ये ती असताना पीपीई कीट नव्हते. सुविधा नसतील. त्यामुळे ती पॉझिटिव्ह झाली व तिला रुग्णालयातच रहावं लागलं.

आज तिचा मला स्वाभिमान आहे.‌ तिने समाजासाठी चांगले काम केले आहे. गुन्हे दाखल करायचे तर करा. मी कुणालाही बोलवलं नव्हतं. मी रॅली काढली नाही. कुणाला ढोल वाजवायला सांगितले नाही.जे काही आहे ते नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे झालेलं आहे. चुक भूल देणे घेणे. स्वागत केले, ते सुद्धा पाच मिनिटांतच केले. जमावबंदीच उल्लंघन केलेले नाही. मी तीस वर्षे समाजात आहे. कधीही चुकीचे काम केलेले नाही. करणार नाही. मी संभाजीनगरवासियांसाठी जीवाची पर्वा केलेली नाही.तर गुन्ह्याची काय पर्वा करणार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT