crime news esakal
पिंपरी-चिंचवड

माजी मंत्री, शासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सहीचे लेटर देवून फसवणूक

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात रुग्णवाहिका चालक पदावर कॉल लेटर देतो, असे सांगत एकाकडून साडे सहा लाख रुपये उकळले.

सकाळ वृत्तसेवा

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात रुग्णवाहिका चालक पदावर कॉल लेटर देतो, असे सांगत एकाकडून साडे सहा लाख रुपये उकळले.

पिंपरी - वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात रुग्णवाहिका चालक पदावर कॉल लेटर देतो, असे सांगत एकाकडून साडे सहा लाख रुपये उकळले. त्यानंतर शासकीय अधिकारी व माजी मंत्र्याच्या बनावट व खोट्या सहीचे लेटर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी गणपत एकनाथ गीते (रा.नागेश्वरनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम सुनील पाटील (वय २६, रा. कृषीनगर, ढेकू रोड, अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीस वैद्यकीय संशोधन व शिक्षण विभाग मुंबई यांच्याकडे रुग्णवाहिका चालक या पदावर कॉल लेटर देतो, असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरूपात एकूण सहा लाख ६६ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांच्या सहीचे व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांची खोटी व बनावट सही असलेले लेटर देऊन फिर्यादीला कर्तव्यावर रुजू करून केले. तसेच सौरभ विजय, सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग महाराष्ट्र राज्य-मुंबई यांच्या सहीची बनावट व खोटी पत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवले. यातून फिर्यादीची दिशाभूल करून फसवणूक केली. हा प्रकार ९ मार्च ते २१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत देहूगाव, विमाननगर, निगडी, नाशिक, आमदार निवास,मुंबई येथे घडला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT