pune sakal
पिंपरी-चिंचवड

‘पे अँड पार्क’वर फुकट्यांचीच गर्दी

महापालिका अधिकारी, कर्मचारी, पोलिसांचीच वाहने अधिक

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेने एक जुलैपासून ‘पे अँड पार्क’ योजना लागू केली आहे. परंतु, महापालिका अधिकारी व कर्मचारी ओळखपत्र दाखवून फुकट वाहने लावत असल्याचे चित्र आहे. परिणामी, इतर वाहनांना जागा अपुरी पडत असल्याचे ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील जागेत ४५० पे अँड पार्कची ठिकाणे निश्चित केली आहेत. परंतु, या जागांवर पैसे न देता वाहने लावून जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. (PCMC News)

याबाबत कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, काही पोलिस व नगरसेवक आपल्या भागातील अशा ठिकाणांवर वाहने उभी करतात. महापालिकेचे बरेच अधिकारी आणि कर्मचारी पैसे देत नाहीत. आमच्यासाठी शुल्क नाही असे सांगतात. याबद्दल नागरिकही पार्किंग शुल्क देण्यावरून दररोज भांडतात. अजून मारहाण झालेली नाही, पण शिविगाळ करतात, दम देतात.

महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही स्वतंत्र सवलत लागू नाही. विनाशुल्क वाहने लावली जात आहेत का? याची मी माहिती घेतो.

- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

SCROLL FOR NEXT