पिंपरी-चिंचवड

भोसरीत गणेशमूर्तींचे स्टॉल उभारणी सुरू, मात्र बहुतांश चौकांमध्ये शांतताच

संजय बेंडे

भोसरी : गणेशोत्सव दोन आठवड्यांवर आला असून, भोसरी परिसरात गणेशमूर्ती विक्रीचे स्टॅाल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. विविध आकारातल्या गणेशमूर्तींची निवड नागरिकांद्वारे आतापासूनच करण्यात येत आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे मूर्तिकारांनी कमी प्रमाणात मूर्त्या घडविल्या आहेत. त्यामुळे मूर्त्यांचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरीतील पीएमटी चौक, राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिससह शाडू मातीच्या अर्धा ते चार फुटांपर्यंत उंचीच्या मूर्त्या पहायला मिळत आहेत. पीएमटी चौक, आळंदी रस्ता, दिघी रस्ता, स्पाइन रस्त्यावरील जयगणेश चौक, इंद्रायणीनगरातील मिनी मार्केट, श्री तिरुपती बालाजी चौक आदी परिसरात दरवर्षी गणपती विक्रीसह विविध सजावटीच्या साहित्याचे स्टॅाल लावले जातात.  या ठिकाणी भाविक गणेशमूर्ती घेण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. मात्र, यंदा आळंदी रस्त्यावरील एक स्टॅाल वगळता इतर ठिकाणी अद्यापही स्टॅाल उभारलेले नाहीत. कोरोनामुळे प्रशासनाने दुकानदारांना विविध नियमावली घालून दिली आहेत. त्यामुळे या चौकात स्टॅालला परवानगी मिळते का, ते पहावे लागेल. भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले, की सरकारने गणेशोत्सवाविषयी विविध नियमावली तयार केली आहे. मात्र, याचा आध्यादेश आमच्यापर्यंत अद्याप आलेला नाही. तो मिळाल्यावर गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची सोशल मीडियाद्वारे सभा घेऊन जनजागृती करण्यात येईल. 
                   
दहीहंडीवरही बंदी...

कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी बुधवारी (ता. १२) आलेला दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचे आवाहन भोसरी पोलिसांद्वारे करण्यात आले आहे. तसेच, साजरा करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिले आहेत.   

Edited by Shivnandan Baviskar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पुणे गारठले! पारा थेट ९.८ अंश सेल्सिअसवर, थंडीने हुडहुडी वाढवली; पण 'या' दिवसांपासून पुन्हा वाढणार

Latest Marathi News Live Update : नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

संतापजनक घटना ! 'मंगळवेढ्यात बहिणींसमोर अश्लील कृत्य'; चौघांविरुद्ध गुन्‍हा, दाेघीजण घराच्या मागे गेल्या अन्..

Pune Bhigwan Railway : पुणे–भिगवण रेल्वेमार्गावर मोठा बदल; स्वयंचलित सिग्नलिंगमुळे गाड्या आता एकामागून एक धावणार

'इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीची तरुणाशी ओळख'; तिने भेटण्यासाठी डेहराडून गाठलं अन् धक्कादायक माहिती आली समाेर..

SCROLL FOR NEXT