पिंपरी-चिंचवड

...म्हणून नवी सांगवी परिसरात गणेशमूर्तींची मागणी घटली

मिलिंद संधान

नवी सांगवी (पिंपरी चिंचवड) ः एकीकडे नागरिक कोरोनापासून आपला बचाव करीत आहेत, तर दुसरीकडे आपले छोटेमोठे उद्योगधंदे व नोकऱ्या टिकविण्यासाठी धडपड करीत आहेत. या सगळ्यांमध्ये सण-उत्सवही अपवाद राहिले नाहीत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, गणेशमूर्तींना मागणी नसल्याने मूर्तिकार व व्यावसायिक मोठ्या चिंतेत सापडले आहेत. त्यामुळे आता विघ्नहर्ताच त्यांना यातून मार्ग दाखवेल, अशी अपेक्षा पिंपळे गुरव येथील ज्येष्ठ मूर्तिकार रविंद्र चित्ते यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. सरकारकडून गणेशोत्सवाबाबत वेगवेगळे आदेश निघत असल्याने मूर्त्यांच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे वर्षभराच्या कामावर पाणी फिरतेय की काय, अशी स्थिती असल्याचे चित्ते यांनी सांगितले. 

सर्वसाधारण गणपती मूर्तिकार दिवाळीनंतर मूर्ती बनविण्याचा श्रीगणेशा करतात. जानेवारीपर्यंत साच्यातून मूर्ती तयार केल्या जातात. त्यानंतर फेब्रुवारी ते मार्चपर्यंत त्या मूर्त्यांना अंतिमरूप देत एप्रिलपासून रंग कामाला सुरुवात होते. परंतु, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउन सुरू झाल्यामुळे या मूर्तीकारांपुढे या ना त्या कारणाने दररोज नवनवीन संकटे येत आहे. नकली दागिणे, रंगाचे कारखाने बंद झाले. वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मूर्त्या घडविल्या. परंतु, त्याला रंगकाम व दागिण्यांची सजावट करायला अडथळे येऊ लागले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारने चार फूट उंची पर्यंतच्याच मूर्त्यांना परवानगी दिली आहे. त्यातच पोलिस प्रशासनानेही सार्वजनिक मंडळांना साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केल्याने छोट्या मंडळांकडून गणपती बुकींग होत नाही. त्यामुळे यंदा चाळीस टक्के मूर्त्या विक्रीअभावी तशाच पडून राहतील, अशी भीती सर्वच मूर्तिकारांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, गणेश विसर्जनही घरच्या घरीच करण्याचेही आवाहन सरकारकडून आले आहे. पूर्वी घरगुती गणपतींसाठी एक ते दोन फूट उंचीच्या मूर्त्यांना सर्रास मागणी होती. परंतु, ती आता केवळ सहा इंच पर्यंतच्या गणपतीपर्यंत आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मूर्तिकार रविंद्र चित्ते म्हणाले, "कोरोनामुळे आम्ही संपूर्ण खबरदारी घेत आहोत. मूर्ती बनविण्याचा परिसर निर्जंतुकीकरण करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहोत. परंतु, ग्राहकांनीही संपूर्ण घरादाराने गणपती बुकींगसाठी न येता केवळ एकाच व्यक्तीने यावे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्याही बेकींग सोड्याच्या पाण्यात विसर्जित होत आहे. त्यामुळे शाडूच्याच मूर्त्यांचा भाविकांनी आग्रह धरू नये."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

उजनीत ८१ हजार क्युसेकची आवक! पुण्यातील पश्चिम घाटमाथ्यावर दमदार पाऊस, 3 दिवसांत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता; गतवर्षी धरण 27 मे रोजी प्लसमध्ये, वाचा....

Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

SCROLL FOR NEXT