cp.jpg 
पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये 'हे' काय सुरू आहे

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहरातील अण्णासाहबे मगर स्टेडियमचा चेहरा आता बदलला असून, ही जागा आता अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या हातगाड्यां ठेवण्यासाठी डम्पिंग ग्राउंड म्हणून नावारुपाला आले आहे. मैदानाच्या परिसरात सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेल्या हातगाड्या, टपऱ्यांमुळे या भागात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून आजूबाजूच्या परिसराला त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काही दिवसांपूर्वी हे स्टेडियम पाडून त्याचा पुर्नविकास करण्याचे धोरण महापालिकेकडून निश्‍चित करण्यात आले होते. लॉकडाउन लागण्याच्या अगोदर स्टेडियम पाडण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. आता लॉकडाउन शिथिल होत असला तरी स्टेडियमच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.

दरम्यान, सध्या या स्टेडियमचा अर्धा अधिक परिसर हा अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या, टपऱ्या, टेम्पो, क्रेट यानेच भरला आहे. स्टेडियमवर असणाऱ्या जॉगिग ट्रॅकच्या परिसरात हे सर्व पडले आहे, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 

सध्या लॉकडाउन सुरु असला तरी महापालिकेने पूर्वी मंजूर झालेली कामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या स्टेडियमचे कामही तत्काळ सुरु करण्याची गरज आहे. पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे याठिकाणी पाणी साठून आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होउ शकतात. सध्या कोरोनोचे संकट आहे, त्यामुळे या मैदानावर ठेवण्यात आलेल्या हातगाड्या अन्यत्र हलवण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT