Chandrakant Patil Sakal
पिंपरी-चिंचवड

गिरवली घाट दुर्घटनेतील जखमी विद्यार्थीनींची पालकमंत्र्यांकडून विचारपूस

आंबेगाव तालुक्यात गिरवली घाट येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पाटील यांनी गुरुवारी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

सकाळ वृत्तसेवा

आंबेगाव तालुक्यात गिरवली घाट येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पाटील यांनी गुरुवारी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

पिंपरी - साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थीनींची पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मायेने, आस्थापुर्वक विचारपूस केली. घाबरू नको, लवकर बरी हो म्हणत त्यांनी हातातले चॉकलेट विद्यार्थीनीच्या हातात दिले. त्यामुळे काही वेळ वेदना विसरून त्या मुलींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

आंबेगाव तालुक्यात गिरवली घाट येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पाटील यांनी गुरुवारी (ता. २९) साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार करण्याच्या व आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी डॉक्टरांना‌ केल्या.

आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी गेलेल्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेच्या बसचा मंगळवारी (ता. २७) अपघात झाला. दुर्घटनेत किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारांती पालकांकडे सोपविण्यात आले होते. पाच विद्यार्थी आणि चालकावर भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांनी जखमी विद्यार्थीनी आणि चालकाची भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. जखमींवर चांगले उपचार करण्याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. उपचाराचा खर्च राज्य करणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगले उपचार द्यावेत, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना चॉकलेट, खाऊ देवून पालकमंत्र्यांनी मायेने विचारपूस केल्याने ही भेट त्यांच्यासाठी सुखद ठरली. यावेळी साईनाथ रुग्णालयाचे संचालक डॉ. सुहास कांबळे, भाजपचे गणेश भेगडे, अमोल थोरात, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, ताराचंद कराळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level Today : कोयना धरण 60 टक्क्यांच्या उंबरठ्यावर; महाबळेश्वर खोऱ्यातही पावसाची जोरदार बॅटिंग, 24 तासांत 2.35 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ

Fifa World Cup Final : स्पेनने १६ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला, पण त्यांना खरी ट्रॉफी मिळालीच नाही; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली ट्रॉफी नकली होती? नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : आंदोलकांना रोखण्यासाठी नाकेबंदी, पोलिसांनी बॅरिकेड्सना केलं वेल्डिंग

Jamkhed Accident: भाजप आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्याच्या वाहनाला अपघात; अंगरक्षकासह तिघे गंभीर जखमी, चालकाचा ताबा सुटला अन्..

Nashik Milk Collection : नाशिक विभागात खळबळ! FDA च्या धडक कारवाईनंतर तब्बल 2 लाख लिटरने दूध संकलन घटले; काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT