Ratan-Tata 
पिंपरी-चिंचवड

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न द्या!

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - टाटा उद्योग समूहाने कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी पंधराशे कोटी रुपयांची मदत केली आहे. देशावर ज्यावेळी संकट येईल. यापूर्वीही त्यांनी देशाच्या मदतीसाठी वेळोवेळी मदत केलेली आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकिकातसुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे. टाटा  उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, असा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मंजूर करण्यात आला. राज्य व केंद्र सरकारकडे तो पाठविण्यात येणार आहे. 

टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत तब्बल दीड हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. मुंबई येथील ताज हॉटेल विनामोबदला कोरोना योद्ध्यांना राहण्यासाठी उपलब्ध करुन दिले.

पिंपरी-चिंचवड शहर व देशावरील संकट काळातही त्यांचे मोठे योगदान आहे. अनेकांना उद्योग, व्यावसाय, नोक-या उपलब्ध करुन देण्यात त्यांचा वाटा सहभाग आहे. यामुळे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, असा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. उपमहापौर तुषार हिंगे यांनी उपसूचनेद्वारे ठराव मांडला. तर, कामगार नेते व नगरसेवक केशव घोळवे यांनी अनुमोदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT