पिंपरी-चिंचवड

पॅकेजद्वारे चिनी वस्तूंना पर्याय द्या; पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजतर्फे मागणी

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : केंद्र सरकारने उद्योजकांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचा वापर करून उद्योजकांची चिनी वस्तूंना पर्यायी उत्पादने तयार करावीत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ऍड. अप्पासाहेब शिंदे यांनी केली आहे. 

यासंदर्भात ऍड. शिंदे यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, की सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांसाठी जाहीर केलेले आर्थिक पॅकेज हे आत्मनिर्भर भारत या योजनेला पूरक आहे. आर्थिक कर्ज वाटपाचे बॅंकांचे नेहमीचे निकष व अटी काढून सढळ हाताने तातडीने उद्योजक व सर्व प्रकारातील व्यवसायिक, व्यापारी, सेवा उद्योजक यांना त्यांच्या फेब्रुवारी अखेर थकबाकी असलेल्या सर्व प्रकारातील कर्ज रकमेच्या रकमेत अजून 20 टक्के जास्त रक्कम कर्ज म्हणून जुजबी कागदपत्रे देऊन उचलता येणार आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्ज केल्यानंतर हमखास कर्ज मंजूर करावा व तातडीने ग्राहकास वापरू देण्याचा स्पष्ट आदेश यामध्ये आहे. सदर आदेश रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून दिला आहे. सर्व बॅंकांमध्ये हा आदेश पोचल्याची खात्री चेंबरने केली. कर्ज विनाअधिकचे तारण वा जामीन न घेता तातडीने देणारी योजना खरोखर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 'वरदायी योजना' आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT