पिंपरी-चिंचवड

Video :...अन् पुणे ते पंढरपूरपर्यंतचा प्रवास केला बारा तासांत!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सायकलपटू अजित पाटील यांनी घरी राहून जीपीएस उपकरणाच्या आधारे पुणे ते पंढरपूर अशी एकदिवसीय व्हर्च्युअल राईड बारा तास सायकलिंग करत पूर्णत्वाला नेली. ऑनलाइन उपकरणाच्या आधारे पहिल्यांदाच व्हर्च्युअल राईड आयोजित करण्यात आली होती. 

इंडो ऍथलेटिक्‍स सोसायटीने (आयएएस) त्यांच्या सर्व सदस्यांसाठी यंदाच्या वर्षी पुणे ते पंढरपूर अशी सायकलवारी रद्द करून आयएएस फिटनेस वारी आयोजित केली होती. त्याला संस्थेच्या सदस्यांनी सर्व नियमांचे पालन करत घरातूनच किंवा जवळपासच्या भागांत व्यायाम प्रकार करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयएएसचे संस्थापक-सदस्य अजित पाटील यांनीही सायकल ट्रेनर वापरून घरातूनच ट्रेनरला जोडलेल्या जीपीएस उपकरणाच्या आधारे पुणे ते पंढरपूर अशी व्हर्च्युअल राईड पूर्ण केली. सकाळी सहा वाजता त्यांनी राईडला सुरुवात केली. जेवण, नाष्टा यासाठी विश्रांती घेत त्यांनी रात्री 9 वाजेपर्यंत ही राईड पूर्ण केली. प्रत्येक तासाला साधारणतः सरासरी 20 किलोमीटर या वेगाने त्यांनी 237 किमीचे अंतर पूर्ण केले. त्याबद्दल, संस्थेच्या सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटील म्हणाले, "यावेळेस सायकलवारी झाली नाही. त्यामुळे मला चुकल्यासारखे वाटत होते. वेगळा अनुभव मिळावा, यासाठी व्हर्च्युअल वारी केली. एका जागेवर बसून सायकलिंग करणे अवघड असते. मी यापूर्वी चार तास सायकलिंग केली होती. गाणी ऐकत, जुने फोटो पाहत आणि मित्रांशी फोनवरून बोलत राईड पूर्ण केली.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

गणरायाला निरोप देताना आक्रित घडलं! कृत्रिम तलावात शॉक लागून १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू; लेकाचा मृतदेह पाहून वृद्ध वडिलांचा आक्रोश

ASTROLOGY: या ३ तारखांना जन्मलेले लोक असतात कुबेराचे लाडके? धन-दौलत, प्रॉपर्टीच्या बाबतीत मिळतो भाग्याचा साथ; तुमची जन्मतारीख कोणती?

SCROLL FOR NEXT