kidney sakal
पिंपरी-चिंचवड

''मी मस किडनी दिती पण..'' नातवाला वाचविण्यासाठी आजीची धडपड

भरतला हवी आहे दानशूरांची मदत

सकाळ वृत्तसेवा

वाकड : ‘‘लेकराचं काय वय हायं, देवानं आमच्या पुढं हे काय वाढलंय! मी मस किडनी दिती पण, पैशांचं सोंग कसं आणू वं, आजवर उधार-उसनवारी करून दहा लाख गेलं, अजून डॉक्टर आठ मागत्यात, कुठून आणू एवढा पैसा, तुमच्या पाया पडते, काय बी करा लेकराला वाचवा...’’  हातात फायली घेऊन पुढाऱ्यांना  विनवणी करणाऱ्या आजी रुक्मिणीबाई काळे यांची ही व्यथा.

वाकड (wakad) येथील म्हातोबानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या या आजी  चार वर्षांपूर्वी नातू भरत काळे (वय १७) याचे अचानक पाय वाकडे व्हायला लागले.  हाडे ठिसूळ होत असून वजन उंची व वाढ खुंटल्याचे पालकांच्या लक्षात आले.  डॉक्टरांनी  जन्मतः भरतला एकच किडनी असून ती देखील निकामी होत असल्याचे निदान केले. सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली.  तेव्हापासून दवाखान्याने पाट सोडलीच नाही.  

भरतच्या पायाचे ऑपरेशन केल्यानंतर आजवर चार वर्षांपासून डायलिसिस सुरू आहे. औषधोपचार, विविध तपासण्या करून अखेर डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा शेवटचा उपाय सांगितला आहे.आर्थिक परिस्थिती नाजूक, मोलमजुरी करून गुजराण करणारे काळे कुटुंबीय रुग्णालयाच्या खर्चाने आणखी ग्रासले आहेत. नातवावर थेरगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला आठवड्यातून चार वेळा डायलिसीस, प्लाझ्मा थेरपी, इंजेक्शन द्यावे लागते.  तर  लेक गणेश याचा देखील अपघातात पाय फ्रॅक्चर झाल्याने तो अंथरुणाला खिळून आहे. या दुहेरी संकटापुढे रुक्मिणीबाई आणि काळे कुटुंबीय हतबल झाले आहेत.

भरतला जन्मजात असलेली एकच किडनी सध्या काम करत नाही, त्यामुळे त्याची उंची-वजन वाढत नाही. किडनी प्रत्यारोपण हाच पर्याय आहे. वडिलांचा पाय मोडल्याने त्यांना किडनी देता येत नाही, तर आजी किडनी दानाला तयार आहे. मात्र, रक्तगट मॅच होत नसल्याने प्लाझ्मा थेरपी व इंजेक्शनद्वारे रक्तगट जुळवून येत्या बुधवारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची तयारी आहे.

- डॉ. मनीष माळी, किडनी तज्ज्ञ, किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन

आठ लाखांची गरज

आजी रुक्मिणीबाई किडनी देण्यासाठी तयार झाल्या सर्व वैद्यकीय तपासण्या आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, आता पैशांअभावी त्याचे किडनी प्रत्यारोपण रखडले आहे. शस्त्रक्रियेसाठी सुमारे आठ लाख खर्च येणार आहे. शहरातील विविध संस्था, दानशूर पुढे आल्यास भरतचे प्राण वाचणार आहेत.

डॉक्टर होण्याचे स्वप्न

भरतने नुकतीच १० वीची रुग्णालयातूनच परीक्षा दिली होती. त्याला ५० टक्के गुण मिळाले आहेत. पुढे उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर बनून गोरगरिबांना मोफत उपचार देण्याचे त्याचे स्वप्न आहे. नियतीमुळे लहान वयातच त्याच्या नशिबी दवाखाना आला आहे.

मदतीसाठी संपर्क :

आईचा मोबाईल क्रमांक : 9689494969

बँकेचे नाव :

बँक ऑफ महाराष्ट्र (शाखा : थेरगाव)

खातेधारकाचे नाव :

मैना गणेश काळे

खाते क्रमांक : 60259882445

आयएफसी कोड : MAHB0000853

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT