पिंपरी-चिंचवड

दारू पाजून एअर होस्टेसला मारहाण, लैंगिक अत्याचारही केला; वाकडमधील प्रकार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : दारू पाजून बेदम मारहाण करीत एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली. अभिजित सीताराम वाघ (रा. तापकीरनगर चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली. 

फिर्यादी या एका एअरलाईन्स कंपनीत एअर होस्टेस म्हणून कार्यरत आहेत. तसेच, आरोपीचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी व फिर्यादी यांची टिंडर ऍपवरून ओळख झाली होती. शनिवारी (ता. 26) दुपारी आरोपीने फिर्यादीला हिंजवडीतील एका हॉटेलमध्ये जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर फिर्यादीला घरी नेऊन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता, फिर्यादीने त्यास विरोध केला. त्यावेळी आरोपीने लाथाबुक्‍क्‍यांनी फिर्यादीला बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला, डोळ्याला, तोंडाला दुखापत झाली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आरोपीने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी लैंगिक अत्याचार, मारहाण, अपहरण आदी गुन्हे वाकड पोलिसांनी दाखल करून आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT