पिंपरी-चिंचवड

तो दुचाकीवरून यायचा अन् महिलांना...

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : दुचाकीवरून येत पादचारी महिलांचा विनयभंग केल्यानंतर दुचाकीच्या क्रमांकावरून पकडले जाऊ नये, यासाठी आरोपी वेगळीच शक्कल लढवायचा. दुचाकीच्या नंबर प्लेटवरील चार आकड्यांपैकी पहिल्या व शेवटच्या क्रमांकावर चिकटटेप चिकटवायचा. त्यानंतर राजरोसपणे पादचारी महिलांची छेडछाड करण्याचा त्याचा नेहमीचाच उद्योग होता. अखेर तो वाकड पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 

हर्षल विकास भेगडे (वय 28, रा. पिंपळे निलख) असे आरोपीचे नाव आहे. वाकडमधील पिंक सिटी रोड येथील एका सोसायटीत राहणारी डॉक्‍टर महिला त्यांच्या पतीसमवेत मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यावेळी कस्पटे वस्ती येथील भक्ती जेनेसीस इमारतीच्या जवळ पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या एकाने पादचारी महिलेशी अश्‍लील वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानुसार पोलिसांनी वाकड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्याआधारावर अनेक दुचाकींची तपासणी केली. त्यामध्ये आरोपीने एमएच 12, एस एन 3244 या क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या आरोपीने यापुर्वीही विशालनगर भागात अशाप्रकारची कृत्ये केल्याची पोलिसांना शक्‍यता आहे. हा आरोपी डिलिव्हरी बॉयचे काम करीत असून त्याच्याकडे तीन दुचाकी आहेत. महिलांचा विनयभंग करताना वापरणाऱ्या दुचाकीचा क्रमांक ओळखून आपण पकडले जावू नये, यासाठी दुचाकीच्या क्रमांकातील चार आकड्यातील पहिल्या व शेवटच्या आकड्यावर तो चिकट टेप लावत असे, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, ज्या महिलांबाबत अशाप्रकारच्या घटना घडल्या असतील त्यांनी पुढे येऊन वाकड पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT