पिंपरी-चिंचवड

VIDEO : पिंपरी-चिंचवडसह परिसरात पावसाची जोरदार हजेरी!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी (ता. 31) दुपारी तीन वाजता विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. दुपारपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. कामानिमित्त सुटीचा वार गाठून बाहेर पडलेल्या नागरिकांची ऐनवेळी आलेल्या पावसाने चांगलीच धावपळ उडाली.

पिंपरी, चिंचवड, सांगवी, कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. दुपारच्या उन्हाच्या कडाक्‍यानंतर मात्र, नागरिक काही काळ बरसलेल्या पावसाच्या सरीने सुखावले. मोशी व भोसरीत वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. अवघ्या अर्धा तास पडलेल्या पावसाने ठिकठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचले होते. या पडलेल्या पावसाने दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्क, भोसरी गावठाणातील मारुती मंदिर, पीसीएमटी चौक, कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह समोरील रस्ता, चक्रपाणी वसाहतीकडे जाणारा रस्त्यांसह आदी भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खड्ड्यांचे संकट

पिंपरी चिंचवडकरांना पावसाळ्यात खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. शहरात ठिकठिकाणी मेट्रो, रस्ते व महावितरणाची कामे सुरू असल्याने खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी या सखल भागात साचल्यानंतर नागरिकांचे अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे रस्ते अपघातानंतर पावसाच्या खड्ड्याने होणाऱ्या अपघाताचा सामना नागरिकांना करावा लागणार अशी दाट शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अद्यापही रस्त्यावर राडारोडा  

नाल्यांची स्वच्छता केल्यानंतर अद्यापही महापालिकेकडून रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात आला नाही. पावसाच्या पाण्यात हा कचरा वाहून जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT