pimpri esakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप; वातावरणातही गारठा

ऐन हिवाळ्यात पावसाची हजेरी

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. शहरात ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडत आहे. धुकं, पाऊस आणि थंडी असे एकत्र वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटे अचानक कोसळू लागलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची आज (ता.१) सकाळी तारांबळ उडाली. शहरावर ढग जमा झाल्याने हा हिवाळा आहे की पावसाळा असा प्रश्‍न शहरवासीयांना पडला आहे.

दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस पिंपरी चिंचवड शहरासह राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता मंगळवारी वर्तविली होती.काही भागात पावसासह कडाक्याची थंडी असेल असेही अभ्यासकांनी सांगितले होते. बदलत्या हवामानानुसार पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. वातावरणात बदल झाल्याने गारठा देखील जाणवू लागला आहे. शहराच्या इतर भागात केवळ पावसाचे वातावरण होते, पाऊस मात्र झाला नाही. गुरुवारी शहराचे किमान तापमान १९.० अंश सेल्यिसस नोंदवले गेले.

पावसाच्या रिपरिपीने वातावरण गारठले

जुनी सांगवी, ता.१ जुनी सांगवी परिसरात बुधवारी (ता.१) वातावरण बदलामुळे पावसाने सकाळपासूनच रिमझिम सरीने सुरूवात केली. हलक्या मध्यम सरींच्या रिपरिपने चाकरमानी मंडळी,भाजी विक्रेते यांची तारांबळ उडाली. सांगवी परिसरात मुळा नगर या भागातील विजपुरवठाही काही काळ खंडीत झाला.यामुळे विद्युत पंप बंद राहिल्याने वापरासाठी लागणा-या पाण्याचा खोळंबा झाला. पावसाच्या रिपरिपीमुळे सकाळी रस्त्यावरील वर्दळ कमी होती.वातावरण बदलामुळे आलेल्या पावसामुळे वातावरण गारठले.

स्वेटर की रेनकोट घ्यायचा?

हिवाळा सुरु झालेला आहे. पहाट धुक्याची दुलई पांघरू लागली आहे. दिवाळी संपता संपता बऱ्यापैकी गुलाब थंडीचा मौसम आलेला असतो. त्यामुळे वर्षभर कपाटात जपून ठेवलेले स्वेटर्स, ब्लॅकेट, शाल असे गरम कपडे बाहेर काढले किंवा खरेदी केले जातात. पण यंदा विपरीतच घडत असून ऐन हिवाळ्याच्या दिवसांत पावसाच्या सरी कोसळत असल्याने घराबाहेर पडताना अनेकांना आता थंडीसाठी स्वेटर की पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट किंवा छत्री घ्यावी, असा प्रश्‍ नागरिकांना सतावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT