पिंपरी-चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज दर्शनासाठी पिंपळे सौदागरातील 'या' मंदिरात यायचे, वाचा हा इतिहास

मिलिंद संधान

नवी सांगवी (पिंपरी चिंचवड) : पिंपळे सौदागरातील पवनेच्या काठावर वसलेले शिवकालीन शिवमंदिर आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असले, तरी सौदागरातील भाविकांकरीता ते श्रद्धास्थानच आहे. पिढ्यान् पिढ्या उभे असलेल्या या शिवमंदिराच्या दर्शनाकरीता छत्रपती शिवाजी महाराज येत असतं, असे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. शिवाजी महाराज मावळात फेरफटक्याला जात असताना वा कोकणच्या स्वारीवर निघत असताना या मंदिरातील महादेवाच्या दर्शनाला थांबत असतं. या मंदिराचा संपूर्ण पाया, गाभाऱ्याचा भाग हा दगडी कामात केला आहे. तर कळस वाळू, चुना व शिस वापरून केला होता. परंतु, काही वीसेक वर्षांपूर्वी या मंदिरावर वीज पडल्याने कळसाच्या भागाला हानी पोहोचली होती.  

सौदागरच्या ग्रामस्थांनी शिवशंभो सेवा मंडळाची स्थापना करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू केले. पाया आणि गाभाऱ्याचे पूर्वीचे काम तसेच, ठेऊन केवळ कळसाच्या कामाला सुरुवात केली. त्यावेळस मंदिराच्या वरील भागातील छोट्या बंद खोलीत जुनी पितळाची भांडी, लाकडी पाळणा यासारख्या वस्तू सापडल्या. ग्रामस्थांनी ती भांडी पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील पुरातन वस्तू संग्रहालयात जमा केल्या. त्याच वस्तू संग्रहालयात मंदिराची प्रतिकृती सापडली. मग त्याआधारे सुमारे दोन वर्षात जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले. मंदिरात 1975 साली पहिल्या श्रावणी सोमवारपासून आरती सुरू करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत कोणताही खंड न पडता सकाळ-संध्याकाळ येथे ही आरती सुरू आहे. त्याचबरोबर वीस वर्षांपासून येथे काकड आरतीही सुरू आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रावणात येथे दर सोमवारी व प्रत्येक एकादशीला सायकांळी भजनाचा कार्यक्रम असतो. तसेच, नामजप, शिवलीला अमृत पारायण एक दिवस असते. मागील 29 वर्षांपासून येथे शिवरात्रीला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावेळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, महिला भजन, हरिपाठ, आरती व संध्याकाळी कीर्तन आयोजित करण्यात येते. शिवरात्रीला या भागाला मोठे जत्रेचेच स्वरूप प्राप्त असते. हजारोंच्या संख्येने येथे भाविक येतात व त्या प्रत्येकाला खिचडी व केळीचा प्रसाद दिला जातो. या सप्ताहाचा अखेर काल्याच्या कीर्तनाने होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीही जपली जाते. देश व राज्यावर आलेल्या संकट काळात मंदिराच्या वतीन लाखो रुपयांची आर्थिक मदत व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून श्रमदानही केले आहे. भंडारा डोंगरावरील संत तुकाराम मंदिराकरीता एक लाख, गाथा मंदिरासाठी पन्नास हजार रुपये भेट दिले आहेत. दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वाटप करण्यात येते. मागील वर्षी सांगली, कोल्हापूर पूरग्रस्थांसाठी एक लाख, तर कोरोनाच्या काळात गरजुंना किराणा व धान्याचे वाटपही मंडळाच्या वतीने करण्यात आले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT