HOD denying to send secret report of PCMC Officers and Employees
HOD denying to send secret report of PCMC Officers and Employees 
पिंपरी-चिंचवड

महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे secret report पाठविण्यास विभागप्रमुखांची टाळाटाळ

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गट अ,  ब आणि क वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे गोपणीय अहवाल सादर करण्यास विभागप्रमुखांकडून टाळाटाळ केली जात आहे. विभागाकडील यापूर्वी सादर न केलेले अहवाल, २०१९-२० या वर्षाचे गोपनीय अहवाल ३० एप्रिलपर्यंत पाठविण्याचे तातडीचे परिपत्रक प्रशासनाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी काढले आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका आस्थापनेवरील व प्रतिनियुक्तीवरील गट ‘अ’,  ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल दरवर्षी ३१ मार्च रोजी सादर करणे आवश्यक असते. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या वर्षातील कार्यमुल्यमापन अहवाल सर्व शाखाधिकारी, विभागप्रमुखांनी अहवालाबाबत वेळापत्रकानुसार योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक होते.  हा अहवाल प्रशासन विभागाकडे १६  जानेवारी २०२१ पर्यंत पाठविणे आवश्यक होते. परंतु, अद्याप विभागप्रमुखांनी गोपनीय अहवाल प्रशासन विभागाकडे पाठविले नाहीत. ही बाब योग्य नाही. त्यामुळे विभागप्रमुखांनी विभागाकडील यापूर्वी सादर न केलेले अहवाल, २०१९-२० या वर्षाचे गोपनीय अहवाल ३० एप्रिल २०२१ पर्यंत प्रशासन विभागाकडे तातडीने सादर करण्याचे तातडीचे परिपत्रक प्रशासन विभागाचे उपायुक्त  इंगळे यांनी काढले आहे. 
 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT