पिंपरी-चिंचवड

दुबई, थायलंड, जपान, मध्यमवर्गीय ते झोपडपट्टी;कोरोनाचा पिंपरी-चिंचवडमधील प्रवास 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - आधी तो दुबईहून आला. मग, थायलंडच्या वऱ्हाडात शिरला. जपान, युरोपातून आलेल्यांसोबत मिसळला. एका धार्मिक कार्यक्रमातील भाविकांचा सहकारी बनला. ना कायद्याचा धाक, ना वैद्यकीय क्षेत्राची भिती, त्यांनाही त्याने पछाडले. हळूहळू मध्यमवर्गीयांत आला आणि आता झोपडपट्टीत. कोरोनाचा शहरातील हा छुपा प्रवास. आता त्याला उंबरठ्याबाहेर ठेवण्याचे आव्हान प्रशासनाबरोबर प्रत्येक नागरिकाचेसमोरही आहे. 

पिंपरीच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरात कोरोनाची एन्ट्री झालेल्यांची "हिस्ट्री' एकच, दुबई टूर. वैद्यकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली. वायसीएम व भोसरीतील रुग्णालयात आयसोलेशन कक्ष तयारच होते. सर्वेलियन पथकांमार्फत घरोघरी सर्वे सुरू झाला आणि बॉंब पडावा अशी घटना घडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रहाटणी व भोसरीतील लग्नाचे वऱ्हाड स्वागतसमारंभासाठी थायलंडला गेले होते. त्यातील एकजण पॉझिटिव्ह आढळला. 90 वऱ्हाडींची तपासणी केली. सुदैवाने त्यांना बाधा झालेली नव्हती. अनेकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. पण, जपान, अमेरिका, युरोपातून शहरात येणाऱ्यांची यादीही मोठी होती. त्यातील चार-पाच जण पॉझिटीव्ह आढळले. आठ-दहा दिवस कोणीही बाधित आढळले नाही. सात जण बरे होऊन घरीही पोचले. पण, एका धार्मिक कार्यक्रमाहून परतलेला एक रुग्ण बाधित आढळला आणि संख्या वाढू लागली. पण, "तो' निद्रिस्त अवस्थेत फिरत होता. मध्यमवर्गीयांमध्ये मिसळला होता. आता तर तो "सोशल डिस्टंसिंग' नावापुरतेच मर्यादित असलेल्या इंदिरानगर, आनंदनगर झोपडपट्टीत शिरला आहे. सोमवारी (ता. 18) 18 जण आनंदनगरमध्ये आढळले. मात्र, आता गांभीर्याने बघायला हवे. कारण, शहरात 71 झोपडपट्ट्या आहेत. तिथे त्याचा शिरकाव रोखण्यासाठी आताच प्रभावी उपाययोजना करावी लागणार. प्रशासनाला आणि नागरिकांनाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Asian Games,Cricket: भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा मेडल पक्के! बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक

Mohol Ganesh Mandal Youth Death : गणेश मंडळात चक्कर येऊन 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळला अन्..., कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : 'यूपीआय'वरील शुल्काचा पुनर्विचार करा; ग्राहक पंचायतची मागणी

SCROLL FOR NEXT