पिंपरी-चिंचवड

'जनता कर्फ्यू' पाळणाऱ्या जुनी सांगवीचं आजचं चित्र धक्कादायक

सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने दर रविवारी व गुरुवारी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला जुनी सांगवी व दापोडीकरांनी कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या होत्या. मात्र, शुक्रवारी (ता. १०) येथील रस्ते गर्दीने फुलले होते. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बट्ट्याबोळ झाला होता. त्यातच पुणे जिल्ह्यात कडक लॉकडाउन होणार असल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांनी घर सामान खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती.

एकीकडे चौकांमधून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी पथके कार्यान्वित होती. मात्र, याकडे काणाडोळा करत रस्त्यावंर भाजी खरेदी, विविध वस्तू खरेदीसाठी दुकानांमधून नागरिकांनी गर्दी केली होती. जुनी सांगवी भागात दोन दिवसांपूर्वी विनामास्क बाहेर फिरणाऱ्या जवळपास पन्नास जणांवर आरोग्य विभाग व पोलिस पथक यांनी संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केली होती. ती शुक्रवारी पुन्हा सुरू होती. मात्र, गुरुवारी आम्ही बंद पाळला शुक्रवारी आम्ही घराबाहेर आलेच पाहिजे, अशा अविर्भावात सांगवीकरांनी रस्त्यावर गर्दी केली होती. 

भाजी खरेदीसाठी झुंबड

शितोळेनगर ते एकता चौक या प्रमुख रस्त्यावर दुतर्फा विक्रीसाठी उभ्या असलेल्या भाजी विक्रेत्यांकडून भाजी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. या परिसरात विक्रेत्यांवर अनेकदा पालिका प्रशासनाकडून कारवाईही झाली. मात्र, हातगाड्या जप्त करूनही विक्रेत्यांनी पदपथावरच भाजी विक्रीची दुकाने थाटली आहेत. यातच नेहमीचे विक्रेत्यांपेक्षा बाहेरच्या विक्रेत्यांनी येथे ठाण मांडल्याने भाजी विक्रेत्यांची संख्या तिप्पट झाल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

SCROLL FOR NEXT