पिंपरी-चिंचवड

'बालभारतीच्या पुस्तकातील 'तो' उल्लेख बरोबर', कोण म्हणालं वाचा...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : दरवर्षी बालभारतीकडून छपाईत चुका होतातच. अशी यावर्षी आठवीच्या पुस्तकात एक घोडचूक करण्यात आली आहे. भगतसिंग, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकांच्या नावात ही अक्षम्य चूक करण्यात आली आहे. सुखदेव यांच्याजागी 'कुर्बान हुसेन' फासावर गेले, असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाचे प्रभारी संचालक विवेक गोसावी यांनी अमान्य करत "ती माहिती मूळ पुस्तकात जशी मांडलेली आहे, तशीच घेण्यात आली आहे. त्यामुळे 'कुर्बान हुसेन' या नावाचा उल्लेख चुकीने केल्याचे म्हणणे सयुक्तिक नाही.'' त्यामुळे या पाठातून कोणत्याही प्रकारची सामाजिक भावना दुखावण्याचा प्रश्‍न निर्माण होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आठवीच्या पाठ्यपुस्तकामधील पाठ क्रमांक दोन 'माझ्या देशावर माझे प्रेम आहे' समाविष्ट केला आहे. लेखक यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकांतील प्रकरण क्रमांक तीन 'माझ्या देशावर माझे प्रेम आहे' यामधून घेतलेला आहे. राष्ट्रप्रेम भावनेबद्दल आशय हा विद्यार्थी व शिक्षक यांच्या आंतरक्रियेतून स्पष्ट करण्यात आलेला आहे. या पाठांमध्ये क्रांतिकारकाबाबतची माहिती अभिप्रेत नाही. देशप्रेम भावना जाणीव जागृतीबाबत वर्गातील विद्यार्थ्यांशी झालेली आंतरक्रिया या पाठातून लेखकाने मांडलेली आहे. ती मूळ पुस्तकात जशी मांडलेली आहे, तशीच घेण्यात आली आहे. त्यामुळे कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख चुकीने करण्यात आला आहे. हे म्हणणे संयुक्तिक नाही. त्यामुळे या पाठांतून कोणत्याही प्रकारची सामाजिक भावना दुखावण्याचा प्रश्‍न निर्माण होत नाही. या पाठात स्वातंत्र्यसेनानी कुर्बान हुसेन यांचा उल्लेख चुकीने अंतर्भूत करण्यात आला असून, क्रांतिकारक सुखदेव यांचे नाव वगळण्यात आल्याने वस्तुस्थिती मांडणारा खुलासा विवेक गोसावी यांनी केला आहे. ते म्हणाले, "भाषा विषय पाठ्यपुस्तकांच्या संदर्भात पाठ्यपुस्तकांमधील पाठ, कविता या मराठी भाषा विषय समिती व अभ्यासगटाकडून निवडण्यात येतात. अभ्यासक्रमांची गरज, उद्दिष्टे अभ्यासून योग्य ती पडताळणी करून विचारात घेतले जाते. मूळ साहित्यामध्ये व त्यातील आशयामध्ये बदल करण्याचा अधिकार समितीला नाहीत. 

कोण होते हुसेन? 

कुर्बान हुसेन यांचे क्रांतिकारक म्हणून समाविष्ट केलेले नाव योग्य आहे. कारण कुर्बान हुसेन हे सोलापूरमधील स्वातंत्र्य सैनिक/सत्याग्रही होते. त्यांना 12 जानेवारी 1931 रोजी सहकाऱ्यांसमवेत फाशी देण्यात आली होती. त्यामुळे एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते सर्वपरिचित आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सोलापूर जिल्हा संकेतस्थळावर सुद्धा देण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकामध्येही पाठ क्रमांक आठ सविनय कायदेभंगमध्ये सोलापूर सत्याग्रहाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये कुर्बान हुसेन यांचे कार्य नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर या पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक दहामध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. वरीलप्रमाणे वस्तुस्थिती लक्षात घेता 'क्रांतिकारक सुखदेव' यांचे नाव पाठ्यपुस्तक मंडळाने वगळले म्हणणे ही बाब खरी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT