Home Project Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी उपनगरांत घरांना वाढतेय मागणी

नव्याने विकसित होणारे शहरातील चिखली, मोशी, डुडुळगाव, दिघी, तळवडे, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत, मामुर्डी या भागात अनेक गृहप्रकल्प साकारात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नव्याने विकसित होणारे शहरातील चिखली, मोशी, डुडुळगाव, दिघी, तळवडे, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत, मामुर्डी या भागात अनेक गृहप्रकल्प साकारात आहेत.

पिंपरी - कोरोनामुळे (Corona) बिघडलेले आर्थिक गणित, गटलेले उत्पन्न, शहराच्या मध्यवर्ती अतिविकसित भागातील घरांच्या (Home) न परवडणाऱ्या किंमती यामुळे अनेकांनी घराचे स्वप्न साकार करण्यासाठी उपनगरांतील गृहप्रकल्पांना (Home Project) आणि गुंठेवारीने विकल्या जाणाऱ्या प्लॉटला (Plot) पसंती दिल्याचे दिसत आहे.

नव्याने विकसित होणारे शहरातील चिखली, मोशी, डुडुळगाव, दिघी, तळवडे, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत, मामुर्डी या भागात अनेक गृहप्रकल्प साकारात आहेत. आपापल्या सोयीनुसार व बजेटनुसार फ्लॅट घेण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसते आहे. तसेच, शहरालगतच्या येलवाडी, म्हाळुंगे, मोई, चिंबळी, कुरुळी, चाकण, खराबवाडी, आंबेठाण, केडगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धोनोरे, सोळू, मरकळ आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग झाले असून ते खरेदी करण्याकडेही अनेकांचा कल आहे. मोई शिवारात आमची पाच ठिकाणी प्लॉटिंग होते. त्यातील सर्व फ्लॉट विकले गेले आहेत. आता सुदुंबरे येथील साईटवर बुकिंग सुरू आहे. त्यातील निम्मेपेक्षा अधिक फ्लॉट विक्री झाले आहेत.

दहा लाख रुपये गुंठ्यापासून सुरुवात आहे, असे एका प्लॉटिंग विक्रेत्याने सांगितले.

आम्ही तीन वर्षांपूर्वी भुकूम परिसरात फ्लॅट बुक केला होता. पण, काही कारणाने तो प्रकल्प झाला नाही. शिवाय, आमचे एक लाख रुपयेही बिल्डरने परत केले नाहीत. त्यामुळे आम्ही दुसरीकडे घर शोधत होतो. आम्ही चऱ्होलीत फ्लॅट बुक केला आहे. डिसेंबरपर्यंत ताबा मिळेल, असे बिल्डरने सांगितले आहे. सर्वसोयींनी युक्त हा भाग असून तुलनेने फ्लॅटची किंमत कमी आहे.

- रनिता सागळे, म्हाळुंगे

आम्ही मरकळ शिवारात अर्धा गुंठे जागा चार वर्षांपूर्वी घेतली आहे. पण, तो भाग अद्याप विकसित झालेला नाही. शिवाय, कामाच्या ठिकाणापासून लांब असल्यामुळे तो फ्लॉट विकून शहरानगत घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही मोई, चिंबळी, केडगाव, चऱ्होली परिसरातील जागा बघितल्या आहेत. मोईची जागा पसंत आहे, पण, दहा लाखांच्या खाली द्यायला जागा मालक तयार नाही.

- हर्षद गाडे, मोशी

आम्ही पती-पत्नी शिक्षक आहोत. माझा स्वतःचा एक फ्लॅट आहे. पण, गुंतवणूक म्हणून फ्लॅट किंवा प्लॉट घ्यायचा विचार आहे. शक्यतो, चऱ्होली, आळंदी परिसरात फ्लॅट घ्यायचा आहे. त्यामुळे भाडे मिळून त्यातून उत्पन्न मिळेल. फ्लॅटचे बजेट न बसल्यास रोडटच प्लॉटिंग साइटमधील एक गुंठा प्लॉट घ्यायचा विचार आहे. बजेटचा विचार करून जे सोयीचे होईल, तसा निर्णय घेऊ.

- सुनील कापुरे, सांगवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT