स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन

महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्येही ध्वजवंदन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात विविध ठिकाणी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. विविध राजकीय पक्षांसह संस्था, संघटना, शाळा महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम झाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad corporation) आवारात महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्येही ध्वजवंदन करण्यात आले. प्रभाग समिती अध्यक्ष, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागरिकांचा महापालिकेतर्फे सन्मान करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रम झाला. सामाजिक, वैद्यकीय, साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान केला.

चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारात पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तसेच, पोलिस उपायुक्त व सहाय्यक आयुक्त कार्यालये, सर्व पोलिस ठाणे व चौकींच्या आवारातही ध्वजवंदन झाले.

पोलिस, होमगार्ड, महापालिका सुरक्षा रक्षक, अग्निशामक दलाच्या जवानांनी कवायत करून ध्वजाला मानवंदना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT